agriculture news in marathi, Fill up the pond of the Sangli pond through the above plans | Agrowon

उपसा योजनांतून सांगलीतील तलाव भरून द्या
टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

सांगली ः जिल्ह्यातील टंचाई स्थिती गंभीर होत आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्याचे संकट ओढवण्याची भीती आहे. या स्थितीत कृष्णा नदीवरील टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ उपसा योजनांच्या कालव्यातून जिल्ह्यातील १०५ तलाव भरून घ्यावेत, अशा मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे.

सांगली ः जिल्ह्यातील टंचाई स्थिती गंभीर होत आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्याचे संकट ओढवण्याची भीती आहे. या स्थितीत कृष्णा नदीवरील टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ उपसा योजनांच्या कालव्यातून जिल्ह्यातील १०५ तलाव भरून घ्यावेत, अशा मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे.

जिल्ह्यातील ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू झाल्या आहेत. मात्र, म्हैसाळ योजना तांत्रिक कारणाने अद्याप बंद आहे. या तिन्ही योजनेच्या कालव्याच्या माध्यमातून दुष्काळी पट्ट्यातील १२० तलाव जोडण्यात आले आहेत. त्यापैकी १०५ तलावात पाणी सोडून पिण्याची पाण्याची देणे गरजेचे आहे, असा अहवाल जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तयार केला असून तो जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला आहे.

मिरज, जत तालुक्‍यांतील सर्व तलाव म्हैसाळ योजनेतून भरले जातात. तासगाव तालुक्‍यातील १२ तलाव, बंधारे टेंभूतून, १३ आरफळ योजनेतून, पाच ताकारी योजनेतून तर नऊ तलाव म्हैसाळ योजनेतून भरून घ्यावे लागणार आहेत. आटपाडी तालुक्‍यातील १० तलाव टेंभूतून भरून घ्यायचे आहेत. खानापूर तालुक्‍यातून तीन टेंभूने भरायचे आहेत. कडेगाव तालुक्‍यातील चार तलाव टेंभूने तर एक ताकारीने भरायचा आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यातील सात तलाव म्हैसाळने तर दोन तलाव टेंभूने भरण्याचा प्रस्ताव आहे.

या गावांतील तलाव, बंधारे कोरडे
जत ः बसाप्पावाडी, प्रतापपूर, वाळेखिंडी, कोसारी, बेळुखी, बिरनाळ, तिप्पेहळ्ळी, शेगाव, कुडनूर, अंकले, डोर्ली, हिवरे, शिंगणहळ्ळी, कासलिंगवाडी, बागलवाडी.
आटपाडी ः आटपाडी, बनपुरी, जांभूळणी, पानंद, निंबवडे, शेटफळे, माळी वस्ती, अर्जुनवाडी, झरे.
खानापूर ः भाग्यनगर, वाळूज, वेजेगाव, चिंचणी अंबक, कडेगाव, शिवाजीनगर, कोतीज, बोंबाळेवाडी, बंडगरवाडी, नांगोळे, हरोली, दुधेभावी, घोरपडी, लंगरपेठ.
कवठेमहांकाळ ः लांडगेवाडी, मोरगाव, विठुरायाचीवाडी, धुळगाव, मळणगाव, शिरढोण, देशिंग, भैरववाडी, लोंढे.
तासगाव ः धामणी, पाडळी, हातनूर, हातनोली, बलगवडे, मांजर्डे, पेड, सिद्धेवाडी, बस्तवडे, गोटेवाडी, आळते, लिंब, चिखलगोठण, पानमळेवाडी, शिरगाव, विसापूर, तुर्ची, निमणी, ढवळी, वासुंबे, चिंचणी, नागाव कवठे, कुमठे, आळते, पाडळी, विसापूर, वंजारवाडी, पुनदी, अंजनी, नागेवाडी, मणेराजुरी, मतकुनकी, वज्रचौंडी, उपळावी, योगेवाडी, गव्हाण, सावर्डे.
मिरज ः एरंडोली, शिपूर, सिद्धेवाडी, मालगाव, लक्ष्मीवाडी, आरग, जानराववाडी, बेडग, बेळंकी, भोसे, सलगरे, सोनी, लिंगनूर, गुंडेवाडी, खंडेराजुरी, करोली (एम), कळंबी, खटाव.

इतर बातम्या
कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट...जळगाव ः खानदेशात १ ते ११ जून यादरम्यान झालेल्या...
केळी पीकविमाधारकांना परताव्यांची...जळगाव  ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत...
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाअभावी... कोल्हापूर  : अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या...
कांदा निर्यात, प्रक्रियेवर भर गरजेचा ः...राजगुरुनगर, जि. पुणे : कांदा बाजारभावातील अनिश्‍...
सात महिन्यांपूर्वी विकलेल्या मुगाचे...अकोला ः नाफेडने खरेदी केलेल्या मुगाचे पैसे सात...
महावितरण’द्वारे देखभाल, दुरुस्तीची ९०३३...‘सातारा : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व...
रत्नागिरीत खतनिर्मिती कारखान्यावर छापारत्नागिरी : येथील एमआयडीसी परिसरात मच्छीच्या...
आषाढी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग...पुणे : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर...
गोंदिया जिल्ह्यात २ लाख हेक्‍टरवर...गोंदिया ः राइससिटी असा लौकिक असलेल्या गोंदिया...
आमदार दीपिका चव्हाण यांनी मांडली...नाशिक : जिल्ह्यातील बागलाण व चांदवड तालुक्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती औरंगाबाद : जिल्ह्यातील ७७८ गाव व २७२...
नाशिकला ‘राष्ट्रवादी युवक’चे रेल रोको...नाशिक  : केंद्र व राज्य सरकारच्या अपयशामुळे...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१८-...
जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसरसांगली : कर्नाटकातून कृष्णेचे पाणी जत तालुक्याला...
आषाढी वारीत ३५ हजार विद्यार्थी करणार...सोलापूर : आषाढी वारीत पाच विद्यापीठांतील ३५ हजार...
कात्रजकडून गायीच्या दूध खरेदीदरात वाढपुणे  : दुष्काळी स्थितीत दूध उत्पादक...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
विधीमंडळ अधिवेशन ः सलग तिसऱ्या दिवशीही...मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही...
हायब्रीड बियाणे किमतीवर सरकारी नियंत्रण...पुणे  : महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती...