agriculture news in marathi, final phase of tur harvesting, sangali, maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात तूर काढणी अंतिम टप्प्यात
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 जानेवारी 2018

हंगामाच्या सुरवातीला तुरीला ४ हजार रुपये  प्रतिक्विंटल दर मिळाला. पण गेल्या चार दिवसांपासून २३०० ते ३ हजार रुपये असा दर मिळतो. त्यामुळे आमचा तोटा होतोय. जतमध्ये तूर खरेदी केंद्र सुरू नाही. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात तूर विक्री करावी लागतेय.
- विश्‍वनाथ माळी, तूर उत्पादक शेतकरी, वळसंग, ता. जत, जि. सांगली.

सांगली : जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्‍यात तुरीचे पीक घेतले जाते. येथे तूर काढणी अंतिम टप्प्यात आली आहे.शेतकरी बाजारात तूर विक्रीसाठी येऊ लागले आहेत. सुरवातीच्या काळात तुरीला चार हजार रुपये प्रति क्विंटल असा दर होता. शासकीय खरेदी केंद्र सुरू नसल्याने व्यापाऱ्यांनी दर पाडल्याने शेतकऱ्यांना २५०० ते ३६०० रुपये क्‍विंटल दराने तुरीची विक्री करावी लागते आहे. यामुळे तूर पिकासाठीचा उत्पादन खर्चही निघणे मुश्‍कील झाले आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी पावसाची कमतरता यामुळे तुरीच्या क्षेत्रात घट झाली. पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी तूर पीक काढून टाकले होते. सध्या जत तालुक्‍यात तूर काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, शासनाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी कोणत्याच हालचाली सुरू केल्या नसल्याचे चित्र आहे. वास्तविक पाहता तूर काढणीचा हंगाम सुरू होण्याअगोदर शासकीय खरेदी केंद्र सुरू होणे आवश्‍यक आहे. पण तसे होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी आजमितीस तुरीच्या विक्रीसाठी खासगी व्यापाऱ्यांचा आधार घेत आहेत. शेतकऱ्यांकडील तूर विक्री करून झाल्यानंतर खरेदी केंद्र सुरू केले जाते. यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्राचा उपयोग होत नाही. त्यामुळे हंगाम सुरू होण्यापूर्वीच तूर खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू केले तरच तुरीचे दर वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र, जोपर्यंत खरेदी केंद्र सुरू होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळणार नाही. तुरीला सुरवातीला ४ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. त्याच तुरीला आज अडीच हजार ते तीन हजार सहाशे असा दर मिळतोय. खरेदी केंद्र सुरू नसल्याने व्यापारी फायदा घेत तुरीचे दर पाडताहेत. 

गेल्यावर्षी अपेक्षित पाऊस झाला नाही. याचा फटका तूर पिकाला बसला आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. गेल्यावर्षी एकरी ९ ते दहा क्विंटल उत्पादन मिळत होते. मात्र, यंदाच्या हंगामात ५० किलोच्या तीन ते चार पोत्यांचे उत्पादन मिळतेय. तुरीला दर नसल्याने या पिकाचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...