agriculture news in marathi, In the final stage of the brinjal season | Agrowon

भरीत वांग्याचा हंगाम अंतिम टप्प्यात
टीम अॅग्रोवन
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

जळगाव : राज्यात भरिताच्या हिरव्या आणि पाणीदार वांग्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या बामणोद व भालोद (ता. यावल), आसोदा, भादली (ता. जळगाव) या भागांत वांग्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आता पुढील वर्षाच्या हंगामाची तयारी शेतकरी करीत असून, पीक काढून क्षेत्र रिकामे करण्यास सुरवात झाली आहे.

जळगाव : राज्यात भरिताच्या हिरव्या आणि पाणीदार वांग्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या बामणोद व भालोद (ता. यावल), आसोदा, भादली (ता. जळगाव) या भागांत वांग्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आता पुढील वर्षाच्या हंगामाची तयारी शेतकरी करीत असून, पीक काढून क्षेत्र रिकामे करण्यास सुरवात झाली आहे.

भालोद, बामणोद, पाडळसे, आसोदा, भादली तसेच भुसावळ तालुक्‍यांतील वरणगाव, तळवेल भागांत भरिताच्या वांग्याची बऱ्यापैकी लागवड झाली होती. त्यांचे क्षेत्र तसे मर्यादित होते. नेमकी आकडेवारी कृषी विभागाकडे उपलब्ध नसली तरी सुमारे ६०० हजार हेक्‍टरवर लागवड लागवड झाली होती. ही लागवड पारंपरिक पद्धतीने जुलै महिन्यात झाली. उत्पादन यायला दिवाळीनंतर सुरवात झाली.

हव्याहव्याशा थंडीत ऊब देणारा मेनू म्हणजे भरीत, असे खानदेशवासी मानतात. त्यामुळे हुडहुडी भरविणाऱ्या थंडीत भरीत पार्ट्या रंगू लागल्या होत्या. परंतु मकरसंक्रांतीनंतर भरीत वांग्यांच्या पिकातही बदल होऊ लागतात. अर्थातच वांग्याचा आकार गोलाकार होणे, बिया अधिक निघणे, पाणीदारपणा कमी होणे, कडकपणा, अशा प्रकारचे वांगे येऊ लागले.

तसेच वांगी पक्व होण्यासही काहीसे अधिकचे दिवस लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शिवाय जसे ऊन वाढते, तसे भरीत खाण्याचे प्रमाणही खानदेशात कमी होते. त्यामुळे हे बदल लक्षात घेता अनेक शेतकऱ्यांनी पीक काढून क्षेत्र रिकामे करायला सुरवात केली आहे.

तत्पूर्वी झाडावर पिवळी झालेली दर्जेदार वांगी तोडून ती वाळविली जात आहेत. वाळलेल्या वांग्यातून पारंपरिक पद्धतीने बिया काढल्या जात आहेत. त्या संकलित करून एका कापडात साठविल्या जात असून, पुढे मे महिन्याच्या अखेरीस त्यांची वाफ्यांमध्ये लागवड केली जाईल. रोपे तयार झाल्यानतंर त्यांची जुलैमध्ये लागवड होईल, असे शेतकरी नरेंद्र कोल्हे (बामणोद) यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...