agriculture news in marathi, Finally, the water left in the Tisangi lake | Agrowon

अखेर तिसंगी तलावात सोडले पाणी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

तिसंगी, जि. सोलापूर : पंढररपूर तालुक्‍यातील तिसंगी तलावात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात आमदार गणपतराव देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे, ‘पांडुरंग''चे संचालक तानाजीराव वाघमोडे, ‘सहकार शिरोमणी''चे संचालक भारत कोळेकर, मच्छिंद्र पाटील आदींसह शेतकरी इन लेट नाला येथे ठाण मांडून बसले. त्यामुळे शासकीय यंत्रणेला ४८ तासांच्या प्रतीक्षेनंतर जाग आली आणि अखेरीस तिसंगी तलावात पाणी सोडण्याचा निर्णय झाला. त्यानुसार गुंजवणी धरणातून अर्धा टीएमसी पाणी सोडण्यात आले.

तिसंगी, जि. सोलापूर : पंढररपूर तालुक्‍यातील तिसंगी तलावात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात आमदार गणपतराव देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे, ‘पांडुरंग''चे संचालक तानाजीराव वाघमोडे, ‘सहकार शिरोमणी''चे संचालक भारत कोळेकर, मच्छिंद्र पाटील आदींसह शेतकरी इन लेट नाला येथे ठाण मांडून बसले. त्यामुळे शासकीय यंत्रणेला ४८ तासांच्या प्रतीक्षेनंतर जाग आली आणि अखेरीस तिसंगी तलावात पाणी सोडण्याचा निर्णय झाला. त्यानुसार गुंजवणी धरणातून अर्धा टीएमसी पाणी सोडण्यात आले.

जलसंपदामंत्र्यांच्या सचिवांबरोबर चर्चा करून फलटण येथील नीरा उजवा कालवा कार्यालयाचे कार्यकारी अभियंता ए. पी. निकम यांनी यासंबंधीचे आदेश दिले. तिसंगी तलावात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी संजय कारंडे, अशोक पवार, माजी सरपंच विजय पवार इन लेट नाला येथे आंदोलनास बसले. आंदोलनस्थळी गणपतराव देशमुख यांनी भेट दिली. परिस्थिती पाहून तेही आंदोलनात सहभागी झाले. देशमुख यांच्यासह दीपक साळुंखे यांनी संपूर्ण रात्र शेतकऱ्यांसोबत थंडीत काढली. अखेर मंत्री व प्रशासनाला नमती भूमिका घ्यावी लागली.

दरम्यान, या वेळी आमदार भारत भालके, माजी आमदार शहाजी पाटील, सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, पोलिस निरीक्षक किरण अवचर, राजकुमार केंद्रे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, सरपंच अशोक पाटील, हरिदास थोरात, तानाजी गोफणे, मल्हारी खरात आदींसह अनेक तरुण शेतकरी उपस्थित होते. आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांसोबत चटणी भाकरी खाऊन आंदोलन संपविण्यात आले.

तिसंगी तलावात पाणी सोडताना ४०० क्‍युसेकने पाणी आणून प्रत्येकी २०० क्‍युसेक पाणी तिसंगी तलावात आणि कासेगाव-अनवली परिसरातील गावांना देण्यात यावे, अशी आमची मागणी होती. त्यानुसार हे पाणी सोडण्यात आले, असे देशमुख यांनी सांगितले. यापुढेही अधिकाऱ्यांनी योग्य तो विचार करुन निर्णय घ्यावा, आंदोलनाची अशी वेळ पुन्हा पुन्हा येऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

इतर बातम्या
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
मराठवाड्यात महायुतीचा करिष्मा कायमनांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
पुण्यात गिरीश बापट, बारामतीत सुप्रिया...पुणे  : देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादी...
राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभवकोल्हापूर : गेल्या दहा वर्षांपासून...
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत...नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा...
साताऱ्यात उदयनराजे यांची हॅटट्रिक सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...