agriculture news in marathi, Financial shocks to junk manufacturers | Agrowon

गूळ उत्पादकांना आर्थिक फटका
टीम अॅग्रोवन
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

सांगली : शिराळा तालुक्‍यात गूळ उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र, साखरेच्या दरात झालेल्या घसरणीचा फटका गुळाच्या दरावरही झाला आहे. गेल्या वर्षी गुळाला प्रतिक्विंटल ४ हजार ५०० रुपये असा दर होता. मात्र, यंदाच्या हंगामात सुमारे १ हजार ५०० हजार रुपायांनी गुळाचे दर खाली आले आहे. गुळाला प्रतिक्विंटल तीन हजार रुपये इतका दर मिळात असल्याने गूळ उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

सांगली : शिराळा तालुक्‍यात गूळ उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र, साखरेच्या दरात झालेल्या घसरणीचा फटका गुळाच्या दरावरही झाला आहे. गेल्या वर्षी गुळाला प्रतिक्विंटल ४ हजार ५०० रुपये असा दर होता. मात्र, यंदाच्या हंगामात सुमारे १ हजार ५०० हजार रुपायांनी गुळाचे दर खाली आले आहे. गुळाला प्रतिक्विंटल तीन हजार रुपये इतका दर मिळात असल्याने गूळ उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

शिराळा तालुका हा गूळ उत्पादनाचे आगार मानले जाते. परंतु मजुरांची टंचाई आणि गूळनिर्मितीसाठी लागणारा कुशल गुळव्या यांची वानवा असल्याने गुऱ्हाळघरे संकटात आली आहेत. असे असतानादेखील तालुक्‍यात यंदाच्या हंगामात अंदाजे १० गुऱ्हाळघरे सुरू झाली होती. या तालुक्‍यात साखर कारखानेही आहेत. त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याची हद्द काहीच अंतरावर आहे. कारखाना आणि गुऱ्हाळघरांमध्ये स्पर्धा होते. तालुक्‍यात गेल्या वर्षीपेक्षा उसाचे क्षेत्र कमी झाले आहे. यामुळे गूळ उत्पादनासाठी गुळाची कमतरता भासू लागली. त्यातच साखरेच्या उतरलेल्या दराचा फटका गूळ उद्योगाला बसत असल्याने उत्पादन व व्यवस्थापन खर्च वाढला आहे. यामुळे गूळ उद्योग संकटात सापडला आहे.  

अपेक्षित दर नाही
शिराळा तालुक्‍यातील सर्वच गूळ उत्पादक शेतकरी कऱ्हाड (जि. सातारा) येथील बाजार समितीत गुळाची विक्री करतात. हंगाम सुरू होताना गुळाचे दर चांगले होते. मात्र, साखरेच्या दरात ज्या पद्धतीने घसरण सुरू झाली, त्याचा फटका गुळाच्या दरावर झाला असे गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे बाजार समितीत गेल्या वर्षी ४ हजार ५०० पाचशे रुपये मिळत होता. यंदा याच गुळाला १ हजार ५०० पाचशे रुपयांनी दर कमी झाले. गुळाच्या दरात घसरण झाल्याने गूळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

गुळाचा हंगाम थंडावला
ऊसटंचाई आणि मजुरांची टंचाई याचा फटका गूळ उत्पादनावर बसला आहे. गेल्या वर्षी शिराळा तालुक्‍यात ऊस मुबलक होता. त्यामुळे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गुऱ्हाळ घरे सुरू होती. मात्र, यंदाच्या हंगामात गुळाचे कमी झालेले दर, ऊसटंचाई आणि मजुराची कमतरता यामुळे गुऱ्हाळघरे थंडावू लागली आहेत.

माझे स्वतःचे गुऱ्हाळघर आहे. तालुक्‍यात उसाचे क्षेत्र कमी झाल्याने गुऱ्हाळघरासाठी ऊस कमतरता भासू लागली. त्यातच गेल्या वर्षीपेक्षा गुळाला १५०० रुपयांनी दर कमी मिळतोय. यामुळे आर्थिक नुकसान मोठे आहे.
- अमर मुलाणी,
गुऱ्हाळ घरमालक व गूळ उत्पादक शेतकरी, कोकरूड, जि. सांगली

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...