agriculture news in marathi, FIR on 89 institutions in Ahmednagar District | Agrowon

नगरमध्ये अजून ८९ संस्थांवर गुन्हे दाखल
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

नगर : जिल्ह्यात २०१२ ते २०१४ या दुष्काळी कालावधीत सुरू असलेल्या चारा छावणी चालविणाऱ्या सुमारे ४२६ संस्थांमध्ये अनियमितता आढळली. त्यापैकी २४५ संस्थांवर याआधीच गुन्हे दाखल झालेले आहेत. आता पुन्हा ८९ संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ३३४ संस्थांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अजूनही ९२ संस्थांवर गुन्हे दाखल होणे बाकी आहे.

नगर : जिल्ह्यात २०१२ ते २०१४ या दुष्काळी कालावधीत सुरू असलेल्या चारा छावणी चालविणाऱ्या सुमारे ४२६ संस्थांमध्ये अनियमितता आढळली. त्यापैकी २४५ संस्थांवर याआधीच गुन्हे दाखल झालेले आहेत. आता पुन्हा ८९ संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ३३४ संस्थांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अजूनही ९२ संस्थांवर गुन्हे दाखल होणे बाकी आहे.

दुष्काळाच्या काळात पशुधन वाचवण्यासाठी २०१२ ते २०१४ या दुष्काळी कालावधीत जनावरांच्या छावण्या सुरू केल्या होत्या. त्यात अनियमितता आढळून आली होती. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी झाल्या; पण त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे न्यायालयात याचिका दाखल झाली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने जनावरांच्या छावण्यात अनियमितता आढळल्याने छावण्या चालवणाऱ्या जिल्ह्यांमधील ४२६ संस्थांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आतापर्यंत ३३४ संस्थांवर प्रशासनाने गुन्हे नोंदविले आहेत. या कारवाईत नगर तालुक्‍यातील ५९, पारनेर ३६, पाथर्डी १४, कर्जत १३०, श्रीगोंदे ८१, जामखेड पाच व नेवासे तालुक्‍यातील नऊ चारा छावण्या चालवणाऱ्या संस्थांविरोधात महसूल प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत.

भारतीय दंड संविधान १८६० मधील कलम १८८ नुसार हे गुन्हे नोंदविले जात आहेत. अजूनही ९२ चारा छावणी चालवणाऱ्या संस्थांविरोधात गुन्हे दाखल होणे बाकी आहे. दरम्यान, या कारवाईविरोधात ६९ संस्थाचालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. राज्यातील नगर, सोलापूर, सांगली, सातारा, बीड या जिल्ह्यांत सुमारे एक हजार २७३ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. या छावणी चालविणाऱ्या संस्थांची तपासणी केली असता त्यात अनियमितता आढळलेली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...