agriculture news in marathi, The fireworks of the sparrow will be done according to the planning | Agrowon

नियोजनानुसारच होणार चिमणीचे पाडकाम : डॉ.ढाकणे
सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

सोलापूर : सिद्धेश्‍वर कारखान्याच्या चिमणीचे पाडकाम नियोजनानुसारच होईल, असे महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले. या संदर्भात शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना किंवा पत्र मिळाले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गरज भासल्यास बाहेरून बंदोबस्त मागविला जाईल, असेही ते म्हणाले.

सोलापूर : सिद्धेश्‍वर कारखान्याच्या चिमणीचे पाडकाम नियोजनानुसारच होईल, असे महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले. या संदर्भात शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना किंवा पत्र मिळाले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गरज भासल्यास बाहेरून बंदोबस्त मागविला जाईल, असेही ते म्हणाले.

सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी पाडण्यासंदर्भात उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार पालिकेने ११ ऑगस्ट रोजी कारवाई सुरू केली. मात्र, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यांसाठी स्थगिती दिली. त्याची मुदत शनिवारी (ता. ११) संपत आहे. या पार्श्‍वभूमीवर पालिका काय कारवाई करते याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.

सध्या शहरात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याची मोहीम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. परिणामी चिमणी पाडकामाच्या वेळी पुरेसा बंदोबस्त उपलब्ध होणार नाही, अशी चर्चा सुरू झाली होती.

दरम्यान, गाळप सुरू असल्याने चिमणी पाडू नये, असे पत्र कारखाना व्यवस्थापनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्याबाबत जिल्हा प्रशासनाने अद्याप काही निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, चिमणीच्या पाडकामाला मुदतवाढ देण्यासाठी महापौर शोभा बनशेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्याबाबतही शासनाकडून प्रतिउत्तर आलेले नाही. त्यामुळे पालिकेने पाडकामासाठी तयारी केली आहे.

चिमणीच्या पाडकामासंदर्भात शासनाकडून आम्हाला कोणताही पत्रव्यवहार नाही. या संदर्भात आवश्‍यक तो निर्णय महापालिका आयुक्त घेतील.
- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...