agriculture news in Marathi, first divine garden on Kaneri math, Maharashtra | Agrowon

कणेरी मठावर देशातील पहिले डिव्हाइन गार्डन
राजकुमार चौगुले
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

कोल्हापूर : हजारो फुलझाडांसह विविध प्रकारची संस्कृती दर्शविणारे देशातील पहिले डिव्हाइन गार्डन कणेरी (ता. करवीर) येथे सिध्दगिरी मठाच्या वतीने साकारत आहे. तब्बल अकरा कोटी रुपये खर्चाचे हे गार्डन सहा एकरांत पसरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गार्डनचे उद्‌घाटन करण्याचे नियोजन आहे. फेब्रुवारीच्या अखेरच्या सप्ताहात हा कार्यक्रम होण्याची शक्‍यता आहे.

कोल्हापूर : हजारो फुलझाडांसह विविध प्रकारची संस्कृती दर्शविणारे देशातील पहिले डिव्हाइन गार्डन कणेरी (ता. करवीर) येथे सिध्दगिरी मठाच्या वतीने साकारत आहे. तब्बल अकरा कोटी रुपये खर्चाचे हे गार्डन सहा एकरांत पसरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गार्डनचे उद्‌घाटन करण्याचे नियोजन आहे. फेब्रुवारीच्या अखेरच्या सप्ताहात हा कार्यक्रम होण्याची शक्‍यता आहे.

विविध वनस्पतीबरोबर कोल्हापूरची वैशिष्ट्ये दाखवणाऱ्या छटा या गार्डनची वैशिष्ट्ये आहेत. विशेष म्हणजे मठाला भेट देणाऱ्या भाविकांच्या श्रमदानातून हे गार्डन साकारले आहे. याशिवाय देशभरातील कलाकारांनी कलेच्या माध्यमातून गार्डनमधील शिल्पांना आकर्षक बनविण्याचे काम केले आहे. दोन लाख कुंड्यांचा वापर या ठिकाणी करण्यात आला आहे.

विविध फुलझाडांच्या राशी 
गार्डनमध्ये अधिकाधिकपणे फुलझाडांचा वापर केला आहे. यात बारा वेगवेगळे व्हर्टिकल प्रकार आहेत. कॅकटसचे एक हजार, गुलाबाचे दोन हजार, जास्वंदाच्या एकशे चाळीस प्रकारांसह इतर फुलांचे शेकडो प्रकार या ठिकाणी पाहावयास मिळणार आहेत. हजारो प्रकारची विविध रंगी फुले असणारी ही वेगवेगळी बाग असल्याचा दावा मठाने केला आहे.

विविध प्राण्यांच्या प्रतिकृती
देशी गायीची महाकाय पन्नास फूट उंचीची मूर्ती, बदक, मोर, अष्टविनायक गणपती, विठ्ठल रखुमाई आदींच्या मूर्ती आकर्षकपणा वाढविणाऱ्या ठरणार आहेत. विविध प्रकारचे माठ बनवून त्याला सजवून त्याला स्वर्गीय वातावरणाचे रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील प्रत्येक राज्यातील संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मूर्तीही बागेत आहेत.

अत्याधुनिक ‘ठिबक’चा वापर
बागेतील वनस्पतींना पाण्याचे नियोजन करण्यासाठी ठिबकचा वापर करण्यात आला आहे. दररोज पावणेदोन लाख लिटर पाणी लागणार आहे. याशिवाय महिन्याला २५ लाख रुपयांची झाडे बदलावी लागणार आहेत. जसे सुचेल, जागा मिळेल तशी कल्पकता बाग तयार करताना वापरली आहे. कोल्हापुरातील भवन मंडप, पायताणाच्या प्रतिकृतीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. विविध भागांतील भाविकांनी श्रमदान करून गार्डनच्या उभारणीला मदत केली.

दुबईतून सुचली कल्पना
मठाधिपती काडसिद्धेश्‍वर महाराज दुबईला गेल्यानंतर तिथे गेल्या वर्षी ही कल्पना सुचली. अशा पद्धतीच्या बागा दुबई, सिंगापूरमध्ये पाहावयास मिळतात. आपणाकडे नैसर्गिक विविधता असल्याने आपण अशी बाग तयार करू शकतो. हे लक्षात आल्यानंतर तज्ज्ञांशी चर्चा केली. यानंतर गेल्या फेब्रुवारीत या बागेच्या कामाला सुरवात केली. आता कामे अंतिम टप्प्यात आहेत. ही बाग पाहाण्यासाठी देशभरांतून भाविक यावेत, हा मठाचा प्रयत्न असल्याने श्री काडसिद्धेश्‍वर यांनी सांगितले.

अनोखा आनंद देणारी जंगल सफारी
गुहेमध्ये कृत्रिम जंगल तयार करण्यात आले असून, यातून जंगल सफारी नावाची ट्रेन धावणार आहेत. या ट्रेनच्या दोन्ही बाजूला जंगल वसविण्यात आले आहे. यामध्ये गावातील संस्कृती, लोकांची दिनचर्या, कारागीर, विविध ठिकाणी काम करणारे लोक, प्राणी आदींच्या हुबेहूब प्रतिकृती तयार केल्या आहेत. ट्रेनसाठी पूलही तयार करण्यात आली आहे. शिवाय झुलत्या पुलाचा आनंदही घेता येणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...