agriculture news in Marathi, First industrial corridor for farmers will established in Jalna, Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांसाठीची पहिली औद्योगिक वसाहत जालन्यात
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 मार्च 2018

मुंबई : शेतकऱ्यांची पहिली औद्योगिक वसाहत जालन्यातील परतूर तालुक्यातील आष्टी या गावात होत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचा उद्योजक होण्याचा मार्ग प्रशस्‍त होईल आणि उत्पन्न वाढण्यासदेखील मदत होणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव लवकरात लवकर मंजुरीसाठी सादर करण्यात यावा, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

मुंबई : शेतकऱ्यांची पहिली औद्योगिक वसाहत जालन्यातील परतूर तालुक्यातील आष्टी या गावात होत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचा उद्योजक होण्याचा मार्ग प्रशस्‍त होईल आणि उत्पन्न वाढण्यासदेखील मदत होणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव लवकरात लवकर मंजुरीसाठी सादर करण्यात यावा, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात रुर्बन व मानव विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शासनाचा संकल्प असून त्या दिशेने शासनाची वाटचाल सुरू आहे. यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून या कामाला गती देण्यात येत असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ते म्हणाले, गाव पातळीवर सूक्ष्म नियोजनातून यासाठी हाती घ्यावयाच्या प्रकल्पांची निश्चिती केली जात आहे. जालना जिल्ह्याने पुढाकार घेऊन रुर्बन तसेच मानव विकास कार्यक्रमांतर्गत तयार केलेला कार्यक्रम त्या दिशेने टाकलेले एक चांगले पाऊल आहे.

शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उत्पादनांवर त्याच शेतकऱ्यांच्या औद्योगिक वसाहतीमधील विविध कारखान्यांमधून किंवा उद्योगांच्या माध्यमातून प्रकिया केल्या जातील, त्याचे मूल्यवर्धन केले जाईल, यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. यातून रोजगार संधीची निर्मिती होईल, असे सांगून श्री. लोणीकर म्हणाले की, यासाठी तीन वर्षे कालावधीचा आणि १८५ कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रकल्पासाठी २० एकर जागादेखील उपलब्ध करून घेण्यात आली आहे. 

तसेच मानव विकास मिशनअंतर्गत ५० तर श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशनच्या माध्यमातून ५० प्रकल्प यामध्ये हाती घेण्यात येतील. एका शेतकरी समूहात ५० सदस्य असतील साधारणत: ३०० कुटुंबांना याचा लाभ मिळेल. प्रस्तावित प्रकल्पामध्ये १८ प्रकारच्या कृषी, कृषिपूरक व इतर संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून आष्टी तालुक्यातील १६ खेड्यांना याचा लाभ होईल. यात ६० शेतकरी समूह गट स्थापन करण्यात येतील.

प्रस्तावित रुर्बन प्रकल्पामध्ये मूलभूत सोयीसुविधा, सर्व सुविधा युक्त ६० उद्योग, यंत्रसामग्री, प्रशिक्षण, क्षमतावृद्धी आणि सहाय्य या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम राहणार असल्याचे श्री. लोणीकर यांनी सांगितले. 

इतर अॅग्रो विशेष
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...
दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...
शेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...
कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष? अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...