agriculture news in marathi, First from the Jalna market committee section | Agrowon

जालना बाजार समिती विभागातून प्रथम
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : बाजार समितीच्या कायद्याला अनुसरून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जालना बाजार समितीला महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणे या संस्थेतर्फे विभागातून पहिला पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. विभागातून द्वितीय येणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर व तृतीय आलेल्या जालना जिल्ह्यातील भोकरदन बाजार समितीचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

औरंगाबाद : बाजार समितीच्या कायद्याला अनुसरून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जालना बाजार समितीला महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणे या संस्थेतर्फे विभागातून पहिला पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. विभागातून द्वितीय येणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर व तृतीय आलेल्या जालना जिल्ह्यातील भोकरदन बाजार समितीचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुरुवारी (ता. २७) या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पणन संचालक दीपक तावरे, कृषी पणन मंडळाचे सरव्यस्थापक सुनील पवार, बाजार समिती संघ पुणे, अध्यक्ष दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. बाजार समितीच्या कायद्याला अनुसरून उत्कृष्ट काम करणाऱ्या बाजार समित्यांना कै. वसंत दादा पाटील यांच्या नावाने महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणेच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविले जाते. यंदा पुरस्काराचे हे दुसरे वर्ष होते. औरंगाबाद विभागातून प्रथम पुरस्कार स्वीकारण्यासाठी जालना बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले, मोहन राठोड, चिनके आदींची उपस्थिती होती.

दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या वैजापूर बाजार समितीचे सभापती काकासाहेब रामकृष्ण पाटील, उपसभापती राजेंद्र चव्हाण, संचालक संजय निकम, ज्ञानेश्वर जगताप, भागीनाथ मगर, रामहरी जाधव, दिगंबर खंडागळे, सुरेश आल्हाट, राजेंद्र कराळे, सुरेश तांबे, कैलासचंद्र बोहरा, बद्रीअण्णा गायकवाड, संतोष सूर्यवंशी, उदय सोनवणे, सचिव विजय सिनगार आदींनी पणन संचालकांसह इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. भोकरदन बाजार समितीचे सभापती कौतीकराव जगताप, सचिव दादाराव दळवी, संतोष ढाले आदींनी पुरस्कार स्वीकारला.

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
फळबागेत पाणी साठवण कुंड कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे...
फणस लागवड  उष्ण व दमट हवामान फणस पिकाला मानवते....
ऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...
पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्तस्थानिक नाव    : पेटार, पेटारी,...
उष्ण, कोरडे हवामान मॉन्सून वाटचालीस...महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागावर १००८ हेप्टापास्कल...
भंगाराम तळोधी येथे राइसमिलवर कारवाईचंद्रपूर ः कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिक जिल्ह्यातील ५४३ गावांची...नाशिक ः गावठाण निश्‍चितीसाठी गावांमध्ये ग्रामसभा...
नाशिक : टँकरने पाणीपुरवठ्यासाठी जीपीएस...नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक जाणवू...
अनुदानाअभावी चारा छावण्या संकटातबिजवडी, जि. सातारा : माण तालुक्‍यामध्ये १९७२...