Agriculture News in Marathi, first phase Gujarat assembly election polling on Saturday | Agrowon

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात अाज मतदान
वृत्तसेवा
शनिवार, 9 डिसेंबर 2017

अहमदाबाद, गुजरात ः संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी शनिवारी (ता. ९) मतदान होणार अाहे. पहिल्या टप्प्यात ९७७ उमेदवार रिंगणात अाहेत. त्यात ५७ महिला उमेदवारांचा समावेश अाहे. सुमारे ५० पक्षांनी उमेदवार उभे केले असून, अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी अाहे. पहिल्या टप्प्यात २ कोटी १२ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार अाहेत.

अहमदाबाद, गुजरात ः संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी शनिवारी (ता. ९) मतदान होणार अाहे. पहिल्या टप्प्यात ९७७ उमेदवार रिंगणात अाहेत. त्यात ५७ महिला उमेदवारांचा समावेश अाहे. सुमारे ५० पक्षांनी उमेदवार उभे केले असून, अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी अाहे. पहिल्या टप्प्यात २ कोटी १२ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार अाहेत.

पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र अाणि दक्षिण गुजरातमधील २४,६०० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार अाहे. यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात अाली अाहे. पहिल्या टप्प्यात भाजपचे सर्व ८९ जागांवर उमेदवार निवडणूक लढवित अाहेत. तर कॉँग्रेसकडून ८७ जागांवर उमेदवार उभे केले अाहेत. तर ४४३ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात अाहेत.

अाम अादमी पक्षाचे २१ जागांवर, शंकरसिंह वाघेला यांच्या नेतृत्त्वाखालील जन विकल्प पक्षाचे ४९ जागांवर, तर मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचे ६४ जागांवर उमेदवार निवडणूक लढवित अाहेत. तसेच समाजवादी पक्षाने ४, जेडी (यू) १४, राष्ट्रवादी कॉँग्रेस ३० अाणि शिवसेनेने २५ जागांवर उमेदवार उभे केले अाहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया शनिवारी पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मतदान १४ डिसेंबर रोजी होणार अाहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजप अाणि कॉँग्रेसकडून राज्यात जोरदार प्रचार करण्यात अाला. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी गुजरातमधील निवडणूक प्रतिष्ठेचा विषय बनली अाहे. पाहिल्या टप्प्यातील प्रचाराची सांगता गुरुवारी (ता. ७) झाली. अाता मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले अाहे.

राज्यातील निवडणूक प्रचारात कॉँग्रेसने जीसएटी अाणि नोटाबंदीचा मुद्द्यावर भाजपवर हल्ला चढविला. तर कॉँग्रेस हा गुजरातविरोधी पक्ष असल्याचा अारोप करत पंतप्रधान मोदी यांनी करत ‘गुजरात अस्मिता कार्ड’चा वापर केला. पंतप्रधान मोदी यांनी १५ प्रचार सभा घेतल्या. तर कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही जोरदार प्रचार करत एेतिहासिक सोमनाथ अाणि अन्य मंदिरांना भेटी देत हिंदू मतदारांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.

या वेळी काॅंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी गुजरातमधील प्रचारापासून दूर राहिल्या. माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहनसिंग यांनी राजकोट, सूरत भागांना भेटी देऊन ‘नोटाबंदी हा अर्थव्यवस्था उद्‍ध्वस्त करणारा केंद्र सरकारचा निर्णय अाहे,’ असा प्रचार करत भाजप सरकारला लक्ष्य केले.

कॉँग्रेसचे भाजपपुढे कडवे अाव्हान
यंदाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी कॉँग्रेसने भाजपपुढे कडवे अाव्हान उभे केले अाहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी राजकोट हे भाजपच्या पारंपरिक बालेकिल्ल्यातून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उभे अाहेत. कॉँग्रेसचे उमेदवार आणि राजकोटमधील बडे उद्योजक इंद्रनील राज्यगुरू यांनी त्यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. त्यातच पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनीही जोरदार प्रचार केल्याने भाजपसाठी ही निवडणूक सोपी नसल्याचे चित्र दिसत अाहे.

गुजरातमध्ये पाहिल्या टप्प्यातील मतदान

 • जागा ः ८९
 • मतदार संख्या ः २ कोटी १२ लाख
 • मतदान केंद्रे ः २४,६००

पक्षनिहाय उमेदवारांची संख्या

 • भाजप ः ८९
 • कॉँग्रेस ः ८७
 • अाप ः २१
 • जन विकल्प पक्ष ः ४९
 • बहुजन समाज पक्ष ः ६४
 • समाजवादी पक्ष ः ४
 • जेडी (यू) ः १४
 • राष्ट्रवादी कॉँग्रेस ः ३०
 • शिवसेना ः २५
 • अपक्ष ः ४४३
 • एकूण ः ९७७

इतर ताज्या घडामोडी
स्मार्ट अचिव्हर्स योजनेचे विदर्भातील...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
स्मार्ट अचिव्हर्स योजनेचे वऱ्हाडमधील...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
वरुड येथे दूध दरप्रश्नी `स्वाभिमानी`चे...अमरावती   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध...
स्मार्ट अचिव्हर्स योजनेतील सहावे बक्षिस...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
नाबार्ड पाच हजार `एफपीओं`चे उद्दिष्ट...``नाबार्डने शेतकरी उत्पादक संघ (एफपीओ) स्थापन...
अन्य सस्तनापेक्षा उंदराची विचार...दृष्टी किंवा दृश्यावर आधारीत समस्या सोडविण्यासाठी...
आंदोलन होणार असेल तर, आमचेही कार्यकर्ते...नाशिक : दुधाला दरवाढ दिली असून दूध संघांनी...
पशुखाद्याद्वारेही विषारी घटक शिरताहेत...पर्यावरणामध्ये वाढत असलेल्या सेंद्रिय प्रदूषक...
कोय, भेट पद्धतीने फळझाडांचे कलमीकरणआंब्याची अभिवृद्धी कोय कलम, पाचर कलमांद्वारे केली...
सातत्याने हेडर्स ठरू शकतात मेंदूसाठी...सध्या विश्वचषकामुळे फुटबॉलचा ज्वर सर्वत्र पसरलेला...
शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर कामगंध...जळगाव : बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी...
दारणा धरण ५०, तर पुनंद १०० टक्के भरलेइगतपुरी, जि. नाशिक  :  इगतपुरी...
मुंबईला एक थेंबही दूध जाऊ देणार नाहीनाशिक : दुधाला ठरवून दिलेला दर मिळत नसल्याने...
सोलापूर बाजार समिती पदाधिकारी निवड...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
वीज वितरण यंत्रणा दुरुस्तीसाठी ७५००...नागपूर   : राज्यातील वीज वितरण करणाऱ्या...
परभणीतील पीकविमा परतावाप्रश्नी ठोस...परभणी : पीकविमा परतावाप्रश्नी ठोस तोडगा निघत...
किसान सभा,शेतकरी संघर्ष समितीचा दूध...नाशिक  : दुधाला किमान २७ रुपये भाव द्यावा,...
मंत्री जानकर यांची दूध दरवाढीत एजंटशिप...कऱ्हाड, जि. सातारा : दुग्ध विकास व...
पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची...पुणे  : पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रांमध्ये...
कपाशी नुकसानीपोटी मराठवाड्यासाठी ४०७...औरंगाबाद  : गुलाबी बोंड अळीच्या...