दक्षिण गुजरात, सौराष्ट्राचा कौल मतपेटीत बंद

राजकोट, गुजरात ः विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी (ता.९) येथील महिलांनी मोठ्या उत्साहाने मतदान केले.
राजकोट, गुजरात ः विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी (ता.९) येथील महिलांनी मोठ्या उत्साहाने मतदान केले.

अहमदाबाद, गुजरात : येथील विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी शनिवारी (ता.९) मतदान पार पडले. राजकीयदृष्ट्या सर्वाधिक संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्राचा कौल मतपेटीमध्ये बंद झाला अाहे. सूरत अाणि काही ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर अाहे. अशा ठिकाणी ईव्हीएम यंत्र बदलण्यात अाल्यानंतर मतदान प्रक्रिया पार पडली. काही किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडल्याचे दिसून अाले.

पहिल्या टप्प्यात एकूण ९७७ उमेदवार रिंगणात अाहेत. त्यात ५७ महिला उमेदवारांचा समावेश अाहे. तर पहिल्या फेरीतील मतदारांची संख्या २ कोटी १२ लाख एवढी अाहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत हाती अालेल्या माहितीनुसार,  68 टक्के मतदानाची नोंद झाली होती. सकाळी पहिल्या दोन तासांत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, त्यांचे विरोधी उमेदवार इंद्रनील राजगुरू, कॉंग्रेस नेते अहमद पटेल, गुजरात भाजपचे प्रमूख जितू वाघानी यांनी मतदानाचा हक्क बजावला. राजकोट येथे क्रिकेटर चेतेश्वर पुजारा यांनीही मतदान केले.

२०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक होणार असून त्यापूर्वीची गुजरात विधानसभेची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची मानली जात अाहे. विशेषतः या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिष्ठा पणाला लागली अाहे. पहिल्या टप्प्यातील या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्यासह कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार प्रचार केला अाहे. पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमध्ये १५ प्रचार सभा घेतल्या. तर राहुल गांधी यांनी सौराष्ट्र अाणि दक्षिण गुजरातमध्ये सात दिवस प्रचार केला.

दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया १४ डिसेंबरला होणार अाहे. दरम्यान, मतदानाच्या पूर्वसंध्येलाच पाटीदार अनामत आंदोलन समितीमध्ये मोठी फूट पडली. पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल याचा विश्‍वासू सहकारी दिनेश बांभनियाने राजीनामा देत बंडाचे निशाण रोवले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com