agriculture news in marathi, First Rural Mall in Wardha, Maharashtra | Agrowon

वर्धा येथे साकारला पहिला रुरल मॉल
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

वर्धा : ग्रामीण भागातील महिला बचत गट आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनांना हक्‍काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, याकरिता राज्यातील पहिला रुरल (ग्रामिण) मॉल वर्धा येथे सुरू झाला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या पुढाकाराने उभ्या झालेल्या या मॉलमधून पहिल्या टप्प्यात 72 उत्पादनांची विक्री केली जात आहे.

वर्धा : ग्रामीण भागातील महिला बचत गट आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनांना हक्‍काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, याकरिता राज्यातील पहिला रुरल (ग्रामिण) मॉल वर्धा येथे सुरू झाला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या पुढाकाराने उभ्या झालेल्या या मॉलमधून पहिल्या टप्प्यात 72 उत्पादनांची विक्री केली जात आहे.

ग्रामीण भागातील बचत गट; तसेच शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या शेतमालावर प्रक्रिया करून त्याच्या विक्रीचा प्रयत्न होतो. काही शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनांचे ब्रॅंडिंगही केले. मात्र जिल्हा मुख्यालयी; तसेच मोठ्या शहरांमध्ये असलेल्या खासगी मॉलमध्ये त्यांच्या उत्पादनांना जागाच मिळाली नाही. परिणामी, अनेक दर्जेदार उत्पादन बंद झाली.

शेतकरी कंपन्या व बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीची अडचण ओळखत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी वर्धा येथील मोक्‍याच्या ठिकाणी रुरल मॉल उभारण्याचा निर्णय घेतला. महिला आर्थिक विकास महामंडळ, कृषी समृद्धी प्रकल्पाचे गोवर्धन चव्हाण यांच्यावर या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली.

गोदामाचे पालटले रुपडे
रेल्वे स्थानक व बस स्थानकानजीक वखार महामंडळाचे बंद पडलेले गोदाम होते. त्याचे नूतनीकरण करण्याच्या सूचना महिला आर्थिक विकास महामंडळ, कृषी समृद्धी प्रकल्पातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. एका अशासकीय संस्थेची मदतही नूतनीकरणाच्या कामात घेण्यात आली.

शेतकरी कंपनीकडे व्यवस्थापन
रुरल मॉलचे व्यवस्थापन हिंगणी (ता. हिंगणघाट) येथील ग्रामोन्नती शेतकरी उत्पादक कंपनीकडे देण्यात आले आहे. शेतकरी कंपनी किंवा बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे पॅकिंग करण्याची जबाबदारी महिला आर्थिक विकास महामंडळाकडे आहे. त्यापोटी 10 टक्‍के आकारणी महिला आर्थिक विकास महामंडळ करते. रुरल मॉलचे व्यवस्थापन करणारी शेतकरी उत्पादक कंपनी दहा टक्‍के कमिशन आकारते. अशाप्रकारे 20 टक्‍के कमिशनची आकारणी येथील वस्तूंवर होते, अशी माहिती गोवर्धन चव्हाण यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी केले होते उद्‌घाटन
महात्मा गांधी यांच्या जयंतीला 2 ऑक्‍टोंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रुरल मॉलचे उदघाटन झाले. सद्यस्थितीत विविध प्रकारच्या 72 वस्तूंची विक्री मॉलमधून केली जात आहे. त्यासोबतच सेंद्रिय भाजीपालादेखील विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

इतर अॅग्रो विशेष
फिलिपिन्सच्या शाश्वत शेतीचे गमकफिलिपिन्स हा शेतीप्रधान देश आहे. येथील शेतकरी...
सेंद्रिय शेतीसाठी विविध योजना मानवी आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने...
आंबा पालवीवरील किडींचे एकात्मिक...सर्वसाधारणपणे आंबा पिकामधे नोव्हेंबर महिन्याच्या...
राज्यात ग्रामीण घरकुल योजनेला मिळणार गतीमुंबई : राज्यात ग्रामीण घरकुल योजनेंतर्गत...
करडई पीक सल्लागेल्या काही दिवसांत राज्यात पुन्हा अनेक ठिकाणी...
थंडीची तीव्रता वाढेल, हवामान कोरडे राहीलमहाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन तो १०१२...
रोग-किडींमुळे कापूस उत्पादकांना १५ हजार...शेतकरी मेटाकुटीस, नुकसानीचा पंचनामा आणि मदतीची...
जैवइंधनातून नवीन अर्थनीती निर्माण होणारपुणे : इथेनॉलचा वापर आणि जैवइंधनाच्या...
साखरेच्या किमती सहा महिन्यांत २००...कोल्हापूर : साखरेच्या दरात गेल्या सहा महिन्यांत...
नाशिक ११.४ अंश; गारठा वाढलापुणे : अंदमान निकाेबार समुद्रालगत तयार...
राज्यात पेरू प्रतिक्विंटल ८०० ते ७०००...नागपुरात प्रतिक्विंटल ६००० ते ७००० रुपये नागपूर...
दुष्काळाचे निकष हवेत व्यावहारिक दुष्काळ जाहीर केला, की कृषिपंपांच्या वीजबिलात...
आता पर्याय हवाचरसशोषक किडींबरोबर गुलाबी बोंड अळीकरिताही...
कांद्यावर ८५० डॉलर किमान निर्यातमूल्यनवी दिल्ली/नाशिक : देशांतर्गत दरावर नियंत्रण...
सौर कृषिपंप योजना गुंडाळली?केंद्र सरकारकडून अनुदान देण्यास हात वर मुंबई :...
बीटी कंपन्यांविरोधात तक्रारीस पोलिसांची...वर्धा : कायद्याच्या अखत्यारीत येत नसल्याचे कारण...
धोरणात्मक बदल न केल्यास दूध संघांचा संप...विस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण : भाग ५...
सूक्ष्म सिंचन अनुदानाचे भिजत घोंगडेमुंबई : राज्यातील सूक्ष्म सिंचन योजनेच्या...
हवामान कोरडे, थंडी परतलीपुणे : राज्यावरील ढगांची रेलचेल कमी होताच,...
पीक अवशेषांचे ब्रिक्वेटिंग शेतकऱ्यांसह...शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या पीक अवशेषांची...