agriculture news in marathi, First in the Satara country in cleanliness | Agrowon

स्वच्छतेत सातारा देशात प्रथम
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

सातारा : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत (ग्रामीण) झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये सातारा जिल्हा परिषदेने देशात सर्वात स्वच्छ जिल्हा होण्याचा मान मिळविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन ऑक्‍टोबरला राष्ट्रपती भवनात हे पारितोषिक दिले जाणार आहे. हे पारितोषिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे हे स्वीकारणार आहेत.

सातारा : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत (ग्रामीण) झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये सातारा जिल्हा परिषदेने देशात सर्वात स्वच्छ जिल्हा होण्याचा मान मिळविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन ऑक्‍टोबरला राष्ट्रपती भवनात हे पारितोषिक दिले जाणार आहे. हे पारितोषिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे हे स्वीकारणार आहेत.

सातारा जिल्हा परिषदेने आजवर देश, राज्य पातळीवरील अनेक अभियानांत चमकदार कामगिरी केली आहे. निर्मल भारत अभियानामध्ये झेंडा रोवल्यानंतर सध्या स्वच्छ भारत अभियानातही (ग्रामीण) देशात झेंडा रोवला. यापूर्वी शौचालय बांधून हागणदारीमुक्‍त जिल्हा करण्यात देशात तृतीय, तर ओडिएफ जिल्हा करण्यात राज्य प्रथम क्रमांक मिळविला होता. आता स्वच्छ सर्वेक्षणात देशात प्रथम क्रमांक मिळवून आणखी एक मानाचा तुरा शिरपेचात खोवला आहे.ऑगस्ट महिन्यात देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये केंद्राच्या स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्रालयाने त्रयस्थ संस्थेमार्फत सर्वेक्षण केले होते.

त्यामध्ये स्वच्छतेची उपलब्धतेवर संख्यात्मक व गुणात्मक १०० गुणांचे सर्वेक्षण केले होते. सार्वजनिक जागेवरील स्वच्छतेच्या निरीक्षणास ३० गुण, नागरिक, मुख्य प्रभावी व्यक्‍तीची स्वच्छतेबाबतची माहिती, मते व अभिप्रायास ३५ गुण व स्वच्छताविषयक सद्यःस्थितीला ३५ असे १०० गुणांकामध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात सातारा जिल्ह्याने देशात सर्वाधिक गुण मिळविले. त्याबाबतचे पत्र केंद्रीय सहसचिव अरुण बरोका यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. या यशाबद्दल जिल्हा परिषद पदाधिकारी, प्रशासनाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

इतर अॅग्रो विशेष
साखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...
खरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव  : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...
खोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...
जमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...
मोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...
मंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...
गेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...
उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...
पूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...
कांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...
खानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...
अडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे  : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...
अमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि या वर्षी...
‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी  : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...
ऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...
जागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...
पाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...
विदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...
मराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...
खानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...