धानशेतीत होणार आता मत्स्यपालन

धान शेतीत मत्स्यपालनाचा प्रयोग या वर्षी करण्यात आला आहे. या प्रकल्पाला जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी भेट देत संकल्पनेचे कौतुक केले
धान शेतीत मत्स्यपालनाचा प्रयोग या वर्षी करण्यात आला आहे. या प्रकल्पाला जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी भेट देत संकल्पनेचे कौतुक केले

गडचिरोली ः धान पिकाच्या बांधीलगत साचणाऱ्या पाण्यातच मत्स्यपालन करीत त्या माध्यमातून आर्थिकस्थैर्य मिळविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प या वर्षीपासून सिंरोचा तालुक्‍यात राबविला जात आहे. जानमपल्ली चेक येथील दीपक दुर्गे यांच्या शेतावर राबविण्यात आलेल्या या प्रकल्पाला नुकतीच जिल्हाधिकारी एस. आर. नायक यांनी भेट देत पाहणी केली.  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक प्रकाश पवार यांनी यापूर्वी धानशेतीत मल्चिंगचा प्रयोग केला. शेतकऱ्यांचा त्यालाही प्रतिसाद मिळाल्यानंतर आता धान बांधीलगतच्या पाण्यात मत्स्यपालनाचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे.  जिल्हाधिकारी एस. आर. नायक यांच्यापर्यंत या प्रयोगाची माहिती पोचली. त्याची दखल घेत ते थेट जानमपल्ली येथील दीपक दुर्गे यांच्या शेतावर पोचले. दीपक दुर्गे यांनी त्यांना याविषयी माहिती दिली. उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, तालुका कृषी अधिकारी एच. डी. धुमाळ, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ओ. वाय. लांजेवार यांच्या मार्गदर्शनात हा प्रकल्प राबविला जात आहे. 

विविध प्रजातींचे मत्स्यबीज ‘आत्मा’अंतर्गत धान शेतीत मत्स्यपालन प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पातून रोहू, कतला, मृगळ, सायप्रेनसचे प्रत्येकी एक हजार २५० मत्स्यबीज टाकण्यात आले आहेत. पुढील महिन्यात अन्य जातींचे पुन्हा एक हजार २५० मत्स्यबीज टाकण्यात येणार असल्याचे दीपक दुर्गे यांनी सांगितले. धान शेतीतील मत्स्यपालन या प्रयोगातून चार ते पाच लाख रुपयांचे अतिरिक्‍त उत्पन्न अपेक्षित असल्याची माहितीही त्यांनी दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com