सिंधुदुर्गात मत्स्योत्पादन घटले

मासे
मासे

चिपळूण ः मत्स्य उत्पादनात राज्यात मुंबई, ठाणेपाठोपाठ रत्नागिरी जिल्हा आघाडीवर होता. मात्र शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून कोकणातील मत्स्य उत्पादन घटल्याचे समोर आले आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मोठी घट नोंदविली गेल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.  गेल्या वर्षी २०१७-१८ मध्ये ८० हजार ३४० टन, तर या वर्षी २०१८-१९मध्ये ७३ हजार ७३८ टन इतकी मत्स्य उत्पादनात घसरण झाली. त्या खालोखाल सिंधुदुर्ग व रायगडचा समावेश आहे. रायगडमध्ये या वर्षी ५८ हजार ८४७ टन उत्पादन झाले. या पाठोपाठ रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांची मत्स्य उत्पादनात घसरण झालेली असून, सर्वांत जास्त सागरी प्रदूषण असलेल्या मुंबई, ठाणे या जिह्यांचे मत्स्य उत्पादन विक्रमी असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. सिंधुदुर्ग जिह्यात २०१६ -१७ मध्ये सुमारे २२ हजार टन, तर २०१७-१८ मध्ये २० हजार टनांपर्यंत मत्सोत्पादन झाले होते. २०१८-१९ मध्ये त्यात घट होऊन केवळ १९ हजार ५४ टन इतके मत्स्य उत्पादन झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ठाणे जिह्यात २०१२-१३ मध्ये १ लाख २३ हजार ७९२ टन, २०१३-१४ मध्ये १ लाख २० हजार ९२४ टन, २०१४-१५ मध्ये १ लाख ४७०० टन, २०१५-१६ मध्ये ९९ हजार ५२०  टन, तर २०१६५१७ मध्ये ९७ हजार ८०२ टन मत्स्य उत्पादन झाले. या वर्षी म्हणजे २०१८-१९ मध्ये ठाणे जिह्याच्या मत्स्य उत्पादनात ९९ हजार ४६१ टन इतकी वाढ झाली आहे. मत्स्य उत्पादनाची क्षमता कमी असलेल्या मुंबई उपनगराचे या वर्षी ६३ हजार ५७५ मेट्रिक टन, तर मुंबई शहराचा गेल्या ५ वर्षांत दरवर्षी मत्स्य उत्पादनाचा आलेख चढता असून, २०१६-१७ मध्ये १ लाख ३७ हजार ३४९, तर या वर्षी २०१८-१९ मध्ये १ लाख ५२ हजार ५५७ मेट्रिक टन मत्स्य उत्पादन झाले आहे. ठाणे, मुंबईसह उपनगरांची आजची सागरी स्थिती पाहता सर्वांत जास्त सागरी प्रदूषण या शहरांमध्ये आहे. असे असले तरी येथील मत्स्य उत्पादन मोठ्या प्रमाणात झालेले दिसून येत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या जिह्यांतील बोटी मासेमारीलसाठी मुंबईत जातात. त्या ससून डॉकमध्ये लावल्या जातात. त्यामुळे मुंबईतील मासेमारीचे उत्पादन वाढल्याचे दिसते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com