agriculture news in marathi, fisherman denied to participate in pond auction, nagpur, maharashtra | Agrowon

नागपूर जिल्ह्यातील मच्छीमारांची तलाव लिलावाकडे पाठ
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

नागपूर   ः रॉयल्टीच्या रकमेत प्रती हेक्‍टर १५०० रुपयांनी झालेली घसघशीत वाढ आणि काही तलावांमध्ये असलेले अत्यल्प पाणी या कारणामुळे मासेमारी संस्थांनी जिल्ह्यातील तलावांच्या लिलावाकडे पाठ फिरवली आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या लघू सिंचन विभागाअंतर्गत जिल्ह्यात लहानमोठे मिळून ४५७ तलाव आहेत. यातील दीडशेपेक्षा अधिक तलावांची लिलाव प्रक्रिया रखडली आहे.

नागपूर   ः रॉयल्टीच्या रकमेत प्रती हेक्‍टर १५०० रुपयांनी झालेली घसघशीत वाढ आणि काही तलावांमध्ये असलेले अत्यल्प पाणी या कारणामुळे मासेमारी संस्थांनी जिल्ह्यातील तलावांच्या लिलावाकडे पाठ फिरवली आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या लघू सिंचन विभागाअंतर्गत जिल्ह्यात लहानमोठे मिळून ४५७ तलाव आहेत. यातील दीडशेपेक्षा अधिक तलावांची लिलाव प्रक्रिया रखडली आहे.

जिल्ह्यात लघू, पाझर, गाव, साठवण तसेच माजी मालगुजारी (मामा) मिळून एकूण ४५७ तलाव आहे. पाच वर्षांसाठी हे तलाव मासेमारी संस्थांना मत्स्य उत्पादनासाठी देण्यात येतात. मागील वर्षात १२१ तलावांची निविदा प्रक्रिया जून महिन्यात राबविण्यात आली. त्या माध्यमातून जिल्हा परिषदेला ७२ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. अजूनही दिडशेपेक्षा अधिक तलावांची लिलाव प्रकिया होणे बाकी आहे. पूरेसा पाऊस न झाल्याने अपेक्षित जलसंचय काही तलावात झालेला नाही. त्यामुळे अशा तलावात मत्स्य संवर्धन शक्‍य नसल्याने लिलावाला मत्स्य संस्थांचा प्रतिसाद मिळू शकलेला नाही.

त्यासोबतच मासेमारीसाठी लागणाऱ्या रॉयल्टीच्या रक्‍कमेतही ३०० रुपयांवरुन प्रती हेक्‍टरी १८०० रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. त्या कारणामुळे देखील लिलावाकडे मासेमारी संस्थांनी पाठ फिरविल्याची स्थिती आहे. याबाबत मत्स्य व्यावसायिकांशी संपर्क साधला असता तलावात बारमाही पाणी नसणे आणि रॉयल्टीच्या रकमेत शासनाने १५०० रुपयांनी केलेली वाढ या कारणामुळे लिलावाकडे मासेमारी संस्थांनी पाठ फिरविल्याचे त्यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री...सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री...
अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीतअकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे...
दुष्काळी भागात दाहकता वाढलीसावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग...
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या :...नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य...
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे...
तयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
राज्यात कलिंगड प्रतिक्विंटल ५०० ते २१००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये अकोला ः...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...