agriculture news in marathi, fishery pond borrowing 2.5 crores revenue, marathwada, maharashtra | Agrowon

चार जिल्ह्यांत तलाव ठेक्‍यातून अडीच कोटींची महसूल वसुली
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जानेवारी 2018

औरंगाबाद  : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी या चार जिल्ह्यातील ३२१ तलावांत मत्स्यव्यवसायासाठी दिलेल्या ठेक्‍यातून शासनाला अडीच कोटींवर महसुलाची वसुली झाली, तसेच नीलक्रांती योजना औरंगाबाद जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद  : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी या चार जिल्ह्यातील ३२१ तलावांत मत्स्यव्यवसायासाठी दिलेल्या ठेक्‍यातून शासनाला अडीच कोटींवर महसुलाची वसुली झाली, तसेच नीलक्रांती योजना औरंगाबाद जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद, जालना, बीड व परभणी जिल्ह्यातील तलाव ठेक्‍यातून गत काही वर्षांपासून मिळणाऱ्या महसुली उत्पन्नात तूट आली होती. यंदा मात्र मत्स्यव्यवसायासाठी तलाव ठेक्‍याने देण्याला बरे दिवस आले आहेत. चारही जिल्ह्यांत यंदा ३६१ पैकी तब्बल ३२१ तलाव ठेक्‍याने देण्यात मत्स्यव्यवसाय विभागाला यश आले आहे. या ठेक्‍याच्या माध्यमातून शासनाला अडीच कोटींवर रुपयांचा महसूलही गोळा झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मत्स्यव्यवसायासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील ११२ तलावांपैकी १०४ तलावांचे ठेके देण्यात आले, तर ८ तलावांचे ठेके देणे शक्‍य झाले नाही.
जालना जिल्ह्यातील ६७ तलावांपैकी ६६ तलांवांचे ठेके देण्यात आले असून, एका तलावाचा ठेका देणे बाकी आहे. बीड जिल्ह्यातील १५४ तलावांपैकी १२६ तलावांचे ठेके देण्यात आले असून, २८ तलावांचे ठेके देणे बाकी आहे.

परभणी जिल्ह्यातील २८ तलावांपैकी २५ तलावांचे ठेके देण्यात आले असून, तीन तलावांचे ठेके देणे बाकी आहे. ठेके दिलेल्या तलावांमध्ये एक हजार हेक्‍टरपेक्षा जास्त जमीन अधिक असलेल्या मोजक्‍याच तलावांचा समावेश असल्याची माहिती मत्स्यव्यवसायाच्या विभागीय कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

नीलक्रांती योजनेंतर्गत २०१६-१७ च्या प्रस्तावांना नुकतीच शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. जालना जिल्ह्यात मात्र कोणतीही मान्यता नाही. त्यामुळे उर्वरित तीन जिल्ह्यांत योजना कार्यान्वित होऊन त्या माध्यमातून मत्स्यखाद्यनिर्मिती व संवर्धन तलावांचे खोदखाम होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात औरंगाबाद वगळता इतर जिल्ह्यांत अजून नीलक्रांती योजना कार्यान्वित होणे बाकी आहे. औरंगाबाद जिल्ह्यातच तीन ठिकाणी मत्स्यखाद्यनिर्मितीच्या हालचाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

औरंगाबाद, जालना, बीड व परभणी जिल्ह्यातील चार मत्स्यबीज केंद्रांपैकी जायकवाडी व मासोळी केंद्रावर मत्स्यबीजनिर्मितीचे काम खासगीतून सुरू आहे. गलाटी व मांजरा या दोन केंद्रांवर मात्र अजूनही मत्स्यबीजनिर्मिती सुरू नसल्याची माहितीही मत्स्यव्यवसाय विभागाच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात भाजीपाल्याच्या दरात तेजी कायमपुणे  : उन्हाच्या वाढत्या झळांमुळे...
ब्रॉयलर्स बाजार वर्षातील उच्चांकी...गेल्या आठवड्यात ब्रॉयलर्सच्या बाजारभावात जोरदार...
उपवासाने मूलपेशींच्या क्षमतेत होते वाढवाढत्या वयाबरोबरच मूलपेशींच्या कार्यक्षमतेमध्ये...
शाकाहारामध्येही ‘बी १२’ जीवनसत्त्वाचा...शाकाहारी आहार अधिक पोषक व संतुलित होण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात कृषी अवजारे बँकेस...सगरोळी, जि. नांदेड : सगरोळी (ता. बिलोली)...
पाणी सर्वेक्षणासाठी पुणे विभागातील ११६...पुणे  ः विहीर, बोअरवेलसाठी आवश्यक भूगर्भातील...
मराठवाड्यातील ७४६ लघुप्रकल्पांत ७.७९...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ७४६ लघुप्रकल्पांत...
यवतमाळ जिल्हा प्रशासनाने राबविली अर्ज...यवतमाळ : खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानापोटी नगरला...नगर ः कपाशीवर झालेल्या बोंड अळी प्रार्दुभावाच्या...
नगर जिल्ह्यात ४२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर :  जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईची तीव्रता...
कृषी राज्यमंत्र्यांच्या प्रतिमेला दहा...पुणे : शेतकऱ्यांनो हमीभाव कशाला मागता, मार्केटिंग...
बचत गट आणि महिलांसाठी दुधाळ जनावर वाटप...पुणे : महिला व बालकल्याण आणि पशुसंवर्धन...
अहंकारातूनच माजी खासदाराने जनतेवर...भंडारा : पालघरमध्ये खासदारांचे निधन झाले...
शिवसेना नसली तरी रिपाई भाजपसोबत : रामदस...नागपूर : शिवसेनेने भाजप सोबत युती केली नाही...
शेतीमालाला योग्य भावाची जबाबदारी...इचलकरंजी, जि. कोल्हापूर : ‘‘शेतीमालाला योग्य...
सर्वांच्या प्रयत्नांनीच गोवर्धन उचलला...अतिरिक्त दूध झाल्यास प्रक्रिया वाढविणे, त्यासाठी...
सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट...महाराष्ट्र सध्या दुधाच्या प्रश्नावरून निर्माण...
प्रशासकीय अधिकाऱ्यांना दुग्ध व्यवसाय...‘शेतीपूरक व्यवसाय करा त्यातून आर्थिक स्थैर्य...
अतिरिक्त दूध कमी झाले की दर वाढेल :...राज्यात दूध दराचा गंभीर प्रश्‍न तयार झाला आहे....
पहिला अधिकृत जागतिक मधमाशी दिन आज होणार...संयुक्त राष्ट्रसंघाच्या २० डिसेंबर २०१७ रोजी...