agriculture news in marathi, Five bills came forwards without discussion, Maharashtra | Agrowon

चर्चेला न ठेवताच विधेयके पटलावर : दिलीप वळसे-पाटील
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 मार्च 2018

मुंबई : विधेयके मंजूर करायची असतील तर चार दिवस अगोदर ती पटलावर आली पाहिजेत, त्यानंतर ती चर्चेला घ्यायची असतात; परंतु तसे न करता ही विधेयके, बिले घेण्यात आली आहेत. या पाच बिलांवर नापसंती ठराव आम्हाला द्यायचा आहे. त्यामुळे ती बिले चर्चेला घेऊ नयेत, अशी मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी मंगळवारी (ता.२७) सभागृहात केली. 

मुंबई : विधेयके मंजूर करायची असतील तर चार दिवस अगोदर ती पटलावर आली पाहिजेत, त्यानंतर ती चर्चेला घ्यायची असतात; परंतु तसे न करता ही विधेयके, बिले घेण्यात आली आहेत. या पाच बिलांवर नापसंती ठराव आम्हाला द्यायचा आहे. त्यामुळे ती बिले चर्चेला घेऊ नयेत, अशी मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी मंगळवारी (ता.२७) सभागृहात केली. 

 मंगळवारच्या कामकाजामध्ये तीन ठराव दाखवले आहेत, यावर चर्चा कधी होणार आहे. कामकाज पत्रिका तयार करताना विधिमंडळातील सचिव मंडळाने जी खबरदारी घ्यायला हवी होती ती घेतली नाही, असा आक्षेप दिलीप वळसे पाटील यांनी या वेळी नोंदवला. ११ नंबरमध्ये ५ विधेयके दाखवली आहेत आणि ५ बिले मंजूर करण्याचेही दाखवले आहे. मी विधानसभा कामकाजातील १२३ कडे लक्ष वेधतो.

विधेयके मांडताना ती चर्चेला कशी घ्यावीत. १२३ मध्ये त्याची नोंद आहे. त्यामुळे विधेयके मंजूर करायची आहेत तर चार दिवस अगोदर ती पटलावर आली पाहिजेत. त्यानंतर ती चर्चेला घ्यायची असतात; परंतु तसे न करताच ही बिले घेण्यात आली आहेत. त्यामुळे ५ बिलांवर सहानुभूतिपूर्वक विचार करावा, असेही दिलीप वळसे-पाटील म्हणाले.

दिलीप वळसे-पाटील बोलत असतानाच अध्यक्ष हरिभाऊ बागडे त्यांना थांबवत होते. त्या वेळी वळसे-पाटील यांनी ‘तुम्ही मला बोलू देत नाही अध्यक्षमहोदय’...‘मग मी रागवतो’ अशा भाषेत आपला संताप व्यक्त केला. तर दुसऱ्यावेळी विधेयकाबाबत सांगत असतानाच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मध्येच सांगण्याचा प्रयत्न केला असता, ‘मला बोलू द्या, तुम्ही माझे म्हणणे रेकॉर्डवरून काढून टाका मात्र माझा आवाज दाबू नका’...असे सुनावताच अध्यक्षांनी ‘तुमचा आवाज कोण दाबेल’ असे सांगितले. स्थगन प्रस्ताव फेटाळणे हा अधिकार अध्यक्षमहोदय तुम्हाला आहे; परंतु आज इतके महत्त्वाचे स्थगन प्रस्ताव येत असताना त्यांची भूमिका सभागृहासमोर यायला हवी होती, अशी नाराजी वळसे-पाटील यांनी व्यक्त केली.

इतर अॅग्रो विशेष
भारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...
राज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...
धार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...
चारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...
देशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...
खरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...
दुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...