Agriculture news in marathi, Five dams, including Gangapur, Darna | Agrowon

गंगापूर, दारणासह पाच धरणांतून विसर्ग
टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 जुलै 2018

नाशिक  : गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावल्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे धरणसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. गंगापूर धरणात ७५ टक्के जलसाठा झाल्याने आणि त्र्यंबकेश्वर येथे पाऊस सुरू असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये ३४ टक्के साठा झाला असून, त्यातील गंगापूर, दारणा, चणकापूर, पुनंद या चार धरणांतून पाणी सोडण्यात आले आहे.

नाशिक  : गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावल्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे धरणसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. गंगापूर धरणात ७५ टक्के जलसाठा झाल्याने आणि त्र्यंबकेश्वर येथे पाऊस सुरू असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये ३४ टक्के साठा झाला असून, त्यातील गंगापूर, दारणा, चणकापूर, पुनंद या चार धरणांतून पाणी सोडण्यात आले आहे. तसेच येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला असून प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

 शनिवारी (ता.१४) सकाळपासून सुरू झालेल्या पावसाची चौथ्या (ता.१७) दिवशीही संततधार कायम असून, रविवारी (ता.१६) दिवसभर व रात्रीही कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. भावली धरण ८० टक्के भरले आहे. त्र्यंबकेश्वर व इगतपुरीच्या धरण क्षेत्रात सोमवारीही पावसाची हजेरी कायम होती. त्यामुळे खबरदारी म्हणून गंगापूर धरणातून सकाळी दहा वाजता ३१४४ तर दारणा धरणामधून ३७२६ क्युसेक पाणी सोडण्यात आले. दुपारनंतर पुन्हा विसर्गात वाढ करण्यात आली. त्यामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणातूनदेखील ७२१०, चणकापूरमधून ५६७, पुनंदमधून ११९८ क्युसेक पाणी सोडण्यात आले.

सतर्कतेचा इशारा
जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधून पाणी सोडल्याने गोदावरी, दारणा, कादवा, आरम, गिरणा या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून, नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी केली. धरणांच्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येणार असल्यामुळे प्रशासनाने सावधानतेचा इशारा म्हणून नदीच्या काठालगतच्या रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा (टक्क्यांमध्ये)
 पालखेड समूह २५, वालदेवी ४४, कडवा ४२, चणकापूर ४५, हरणबारी २३

धरणांतील एकूण पाणीसाठा - ३४

 कोरडी धरणे -  भोजापूर, नाग्यासाक्या, माणिकपुंज

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...