agriculture news in Marathi, five hundred crore tur payment pending of farmers, Maharashtra | Agrowon

तुरीचे पाचशे कोटींचे चुकारे प्रलंबित
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 एप्रिल 2018

मुंबई  ः यंदाच्या हंगामात राज्य सरकारने हमीभावाने खरेदी केलेल्या तुरीच्या थकबाकीचे ३०५ कोटी रुपये मंगळवारअखेर (ता.३)  शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. अद्यापही पाचशे कोटींचे चुकारे थकले आहेत. त्यापैकी येत्या आठवडाभरात दोनशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, उर्वरित सुमारे ३०० कोटी रुपयांचे चुकारे कधी मिळणार, हे अस्पष्ट आहे. 

मुंबई  ः यंदाच्या हंगामात राज्य सरकारने हमीभावाने खरेदी केलेल्या तुरीच्या थकबाकीचे ३०५ कोटी रुपये मंगळवारअखेर (ता.३)  शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. अद्यापही पाचशे कोटींचे चुकारे थकले आहेत. त्यापैकी येत्या आठवडाभरात दोनशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, उर्वरित सुमारे ३०० कोटी रुपयांचे चुकारे कधी मिळणार, हे अस्पष्ट आहे. 

राज्यात १ फेब्रुवारीपासून तूर खरेदी सुरू झाली. १८ एप्रिलपर्यंत ही खरेदी सुरू राहणार आहे. सध्या १६७ खरेदी केंद्रांवर ही खरेदी केली जात आहे. राज्यात १ लाख १५ हेक्टरवर तुरीचे उत्पादन अपेक्षित आहे. शासनाने त्यापैकी ४४.६ लाख क्विंटल तूर खरेदीचे लक्ष्य ठेवले आहे. नाफेडने दिलेल्या आकडेवारीनुसार, ३ एप्रिल २०१८ अखेर केवळ १४.३३ लाख क्विंटल तूर खरेदी झालेली आहे. १ लाख १८ हजार शेतकऱ्यांकडून ही तूर खरेदी करण्यात आली आहे. एकूण खरेदीपैकी सुमारे ३० टक्के उद्दिष्टपूर्ती झालेली आहे.

 अजूनही ७० टक्के खरेदी शिल्लक आहे. खरेदीसाठीचा कालावधी फक्त १५ दिवसांचा असताना उद्दिष्टपूर्ती कशी होणार, हा प्रश्‍नच आहे. दुसरीकडे तूर खरेदी सुरू होऊन दोन महिने उलटले, तरी शेतकऱ्यांना पूर्ण चुकारे मिळालेले नाहीत. आतापर्यंतच्या तूर खरेदीचे सुमारे ७८० कोटी रुपये देणे आहे. २५ मार्चअखेर त्यापैकी फक्त सुमारे ३३ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले होते.

अर्थसंकल्पी अधिवेशनात विरोधकांनी थकीत चुकाऱ्यांवरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्य सरकारने वेगवान हालचाली केल्या. त्यामुळे नाफेडकडून नुकतेच पाचशे कोटी रुपये मिळाले आहेत. यातील ३०५ कोटी रुपये मंगळवारअखेर (ता.३) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याचे पणन विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले. उर्वरित दोनशे कोटी रुपयेही लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, तरीही अजून तीनशे कोटी रुपये कधी मिळणार, याबाबत संदिग्धता कायम आहे.
 
तुरीला ५,४५० रुपये हमीभाव आहे. सरकारी खरेदी केंद्रांवर तूर विक्री करूनही चुकारे मिळत नसल्याने शेतकरी खुल्या बाजारात तुरीची विक्री करतात. परिणामी, व्यापारी शेतकऱ्यांना चार हजारांच्यावर भाव देत नाहीत. यात शेतकऱ्यांचे क्विंटलला दीड हजाराचे नुकसान होत आहे. कडधान्ये आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याने राज्यात शेतकऱ्यांना ५ हजार कोटींचा फटका बसणार असल्याचे शेतकरी स्वाभिमान मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सांगितले. नाफेडची सरकारी खरेदी याला जबाबदार असल्याचा आरोपही तिवारी यांनी केला आहे.

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...