agriculture news in marathi, five lakh ton pulse will be distributed before march end | Agrowon

मार्चअखेर पाच लाख टन कडधान्य वितरित करणार
वृत्तसेवा
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

कें द्र सरकारने मार्च २०१८ अखेरपर्यंत संरक्षित साठ्यातील जास्तीत जास्त पाच लाख टन कडधान्यांची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय पोषण आहार व त्यासारख्या इतर योजनांसाठी ही कडधान्ये देण्याचा प्रस्ताव आहे. आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने या प्रस्तावाला नुकतीच मान्यता दिली

कें द्र सरकारने मार्च २०१८ अखेरपर्यंत संरक्षित साठ्यातील जास्तीत जास्त पाच लाख टन कडधान्यांची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय पोषण आहार व त्यासारख्या इतर योजनांसाठी ही कडधान्ये देण्याचा प्रस्ताव आहे. आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने या प्रस्तावाला नुकतीच मान्यता दिली

सध्या देशात एकूण १८ लाख टन कडधान्यांचा संरक्षित साठा आहे. हा साठा कमी करण्यासाठी राज्य सरकारांना कडधान्ये दिली जात आहेत. स्वस्त धान्य दुकानांतून त्यांचे वितरण केले जात आहे. त्याच बरोबरीने शालेय पोषण आहार योजना, अंगणवाडी योजना व त्यासारख्या विविध सरकारी योजनांसाठी कडधान्य पुरविण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे सुमारे साडे तीन ते पाच लाख टन कडधान्याचा साठा कमी होईल, असा अंदाज आहे. या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या मंत्रालयांना त्यांची कडधान्यांची मागणी नोंदविण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.  

केवळ शालेय पोषण आहार योजनेसाठी दरवर्षी सुमारे पाच लाख टन कडधान्य लागतील, असा अंदाज आहे. तर अंगणवाडी योजनेसाठी तीन लाख टन कडधान्यांची आवश्यकता भासेल. 

गेल्या वर्षी डाळींचे दर भडकल्यानंतर केंद्र सरकारने पहिल्यांदाच कडधान्यांचा संरक्षित साठा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार देशांतर्गत खरेदी आणि आयात या माध्यमातून सुमारे २० लाख टन कडधान्यांचा साठा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा आणि टंचाईच्या काळात कडधान्यांची उपलब्धता वाढावी या दुहेरी हेतूने संरक्षित साठा करण्याचा निर्णय घेण्यात आला.   

    कडधान्यांचा बफर स्टॉक : २० लाख टन
    सध्या शिल्लक साठा : १८ लाख टन
    मार्च २०१८ पर्यंत ३.५ ते ५ लाख टन कडधान्य वितरित करणार.
    पोषण आहार योजना, अंगणवाडी योजनांसाठी कडधान्य देणार.
    शालेय पोषण आहार योजनेची कडधान्यांची वार्षिक गरज : ५ लाख टन
    अंगणवाडी योजनेची गरज : ३ लाख टन

इतर अॅग्रोमनी
कापूस, गवार बी आणि हरभऱ्याचे भाववाढीचे...या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने साखर वगळता...
हरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू...
सीताफळाच्या मूल्यवर्धनातून घेतला...`उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी`, अशी...
कापसाच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता...
हलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
हरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...
भात निर्यातीसाठी मागणीबरोबरच भूराजकीय...भारतीय भात निर्यातदारांच्या वाढीसाठी जागतिक...
मका, साखर, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन...
अर्थमंत्री जेटली १ फेब्रुवारीला...नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या...
कापूस उद्योगाचे अमेरिका-चीनच्या...जळगाव : चीन व अमेरिकेत मागील नऊ महिन्यांपासून...
सातत्याने ताळेबंद तपासत शेती राखली...जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील...
हळदीच्या निर्यात मागणीत वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती...
हळदीच्या स्थानिक, निर्यात मागणीत वाढया सप्ताहात नाताळच्या सुटीमुळे आंतरराष्ट्रीय...
ग्राहकाला आधारसक्ती केल्यास 1 कोटींचा...नवी दिल्ली: दूरसंचार कंपन्यांकडून मोबाइल फोन...
युरियाची आयात ४२ लाख टनांवरनवी दिल्ली : भारताची चालू आर्थिक वर्षातील...
मका, हळद वगळता इतर शेतमालाच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस व...
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...