agriculture news in marathi, Five sugar factories started in Khandesh | Agrowon

खानदेशातील पाच साखर कारखाने सुरू
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

जळगाव : खानदेशात पाच साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू झाले असून, गाळपात पुरुषोत्तमनगर (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील सातपुडा सहकारी साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील एस्टीरिया शुगर ली. यांच्याकडूनही गतीने गाळप सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा व यावल येथील सहकारी साखर कारखाने सुरू होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

जळगाव : खानदेशात पाच साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू झाले असून, गाळपात पुरुषोत्तमनगर (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील सातपुडा सहकारी साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील एस्टीरिया शुगर ली. यांच्याकडूनही गतीने गाळप सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा व यावल येथील सहकारी साखर कारखाने सुरू होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

खानदेशात मिळून सुमारे ६० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाल्याचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यात दोन खासगी कारखाने सुरू झाले आहेत. त्यात मुक्ताईनगर येथील मुक्ताई व बेलगंगा (ता. चाळीसगाव) येथील अंबाजी शुगर हे कारखाने सुरू आहेत. अंबाजीकडून जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक दीड ते दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होईल, असे सांगितले जात आहे.

हा कारखाना जुन्या बेलगंगा सहकारी साखर कारखान्यात सुरू झाला असून, तो चाळीसगावमधील प्रगतिशील शेतकरी, उद्योजकांनी खरेदी करून यंदा सुरू केला. १० वर्षे बंदावस्थेतील हा कारखाना सुरू झाल्याने उसाखालील क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल.
जळगाव जिल्ह्यात न्हावी (ता.यावल) येथील मधुकर सहकारी साखर कारखाना व चहार्डी (ता. चोपडा) येथील चोपडा सहकारी कारखाना अजूनही सुरू झालेला नाही. मधुकर यंदा सुमारे एक ते दीड लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करील, असा अंदाज आहे.

चोपडा येथील कारखान्याकडे ऊस उत्पादकांचे पैसे थकले आहेत. या संदर्भातील वाद साखर आयुक्त व जिल्हा प्रशासनाकडे पोचला असून, ऊस उत्पादकांनी कारखान्यातील साखर व इतर बाबी विक्री करून पैसे देण्याची मागणी केली आहे.

धुळे जिल्ह्यात कुठलाही कारखाना सुरू नाही. दोन कारखाने या जिल्ह्यात असून, ते बंदावस्थेत आहेत. शिरपूर येथील कारखाना सुरू करण्याची मागणी शेतकरी संघटनेने मागील वर्षी केली होती. नंदुरबार जिल्ह्यातील डोकारे (ता. नवापूर) येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना सुमारे अडीच ते तीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळ करील, असे सांगितले जात आहे.

इतर बातम्या
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
शिक्षण,विज्ञानाच्या प्रगतीकडे लक्ष...वाळवा, जि. सांगली : ‘‘स्वबळावर उत्पादन क्षमता...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
वाशीम जिल्ह्यात आज ३२ ग्रामपंचायतींची...वाशीम : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या...
अंकलगी तलाव आटू लागलासांगली : जत पूर्व भागातील ४१ गावांना पाणीपुरवठा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील उपयुक्‍त...औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
नाशिक शहरात धावणार 'ई- पिंक रिक्षा'नाशिक : नाशिक शहरातील हिरकणी अटल अभिनव सहकारी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
नगर : चार छावण्यांची परवानगी रद्दनगर : पशुधन वाचविण्यासाठी छावणीला मंजुरी...
औरंगाबादेत चिंच २५०० ते ८५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...