agriculture news in marathi, Five thousand farm lending societies will be restructured say CM | Agrowon

राज्यातील पाच हजार सोसायट्यांचे पुनरुज्जीवन करणार
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 फेब्रुवारी 2018

खामगाव, जि. बुलडाणा : राज्यात आगामी काळात ५००० सहकारी सोसायट्यांचे पुनरुज्जीवन करून त्यांना ‘बिझनेस मॉडेल’ देणार आहे. यासाठी एक खासगी कंपनी सरकारसोबत एक हजार कोटीची गुंतवणूक करण्यास तयार असून, त्याचा करार ‘मॅग्नेटिक इंडिया’मध्ये होऊ घातला आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.

खामगाव, जि. बुलडाणा : राज्यात आगामी काळात ५००० सहकारी सोसायट्यांचे पुनरुज्जीवन करून त्यांना ‘बिझनेस मॉडेल’ देणार आहे. यासाठी एक खासगी कंपनी सरकारसोबत एक हजार कोटीची गुंतवणूक करण्यास तयार असून, त्याचा करार ‘मॅग्नेटिक इंडिया’मध्ये होऊ घातला आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.

कृषी विभागाने आयोजित केलेल्या जिल्हा कृषी महोत्सव उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आ. आकाश फुंडकर, जि. प. अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, आ. डॉ. संजय कुटे, खासदार प्रतापराव जाधव, रक्षाताई खडसे, आ. संजय रायमूलकर, आ. आशिष शेलार, आ. शशिकांत खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘सध्या राज्यातील सहकारी सोसायट्यांची अवस्था दप्तर बंदसारखी आहे. या संस्थांना कार्यान्वित करण्यासाठी ‘बिझनेस मॉडेल’ दिले जाईल. या सोसायट्यांना शेतमाल तारण योजना, कृषी यांत्रिकीकरण बॅंक उभरण्यासाठी पाठबळ दिले जाईल. यात एक खासगी कंपनी १००० कोटी रुपये गुंतवणूक करण्यास पुढे आली आहे. सोसायटीने यंत्राची बॅंक तयार केली की गावातील शेतकऱ्यांना फायदा  होईल.

मुख्यमंत्री म्हणाले, की राज्याने पाठपुरावा केल्यामुळे सोयाबीन, साखर, हरभरा, कापूस आदी शेतमालावर आयात शुल्क वाढवल्याने भाव वाढले. आता केंद्राने अर्थसंकल्पात दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली. सरकारने शेतमाल खरेदी ऑनलाइन सुरू केल्यापासून दलाल साखळी तोडली. हा निर्णय घेतल्यानंतर विरोधक तुटून पडले होते. पण आता थेट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जात असल्याने फायदे दिसून येत आहेत.
राज्याने दिलेली कर्जमाफी ही मागच्या सरकारपेक्षा शेतकऱ्यांसाठी जास्त फायदेशीर ठरल्याचा दावाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. खामगाव शहरात टेक्स्टाइल पार्क उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. 

मुख्यमंत्री म्हणाले की, भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांना यावेळी देण्यात आलेली कर्जमाफी ही मागच्या सरकारपेक्षा शेतकऱ्यांसाठी जास्त फायदेशीर ठरली आहे. आॅनलाइन कर्जमाफीमुळे सरकारवर टीका झाली असली, तरी यामुळे बँकांची बदमाशी व मध्यस्थांची दुकानदारी बंद करण्यात सरकारला यश आल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. मागच्या कर्जमाफीत संपूर्ण विदर्भासाठी २५० कोटी मिळाले, तर यावेळच्या कर्जमाफीत एकट्या बुलडाणा जिल्ह्यासाठी ११२९ पेक्षा अधिक रुपयांची कर्जमाफी देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

साडेतीन वर्षांत शेतकऱ्यांची तिप्पट प्रगती
गत अनेक वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या कार्यकाळापेक्षा भाजपच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची तिप्पट प्रगती झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही प्रगती केवळ कागदावरच नव्हे, तर ती दृष्य स्वरूपात आहे. भाजपच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काँग्रेस सरकारपेक्षा तिप्पट म्हणजेच ६६ हजार कोटी कर्जमाफी केली आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...