agriculture news in Marathi, five thousand farmer will go in customer court against reliance crop insurance company, Maharashtra | Agrowon

विमा कंपनी विरोधात पाच हजारांवर शेतकरी जाणार ग्राहक मंचात
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

रिलायन्स कंपनीकडून अन्याय झाल्याचा आमचा आरोप आहे. या विरोधात आम्ही ग्राहक मंचात वैयक्‍तिक दावे दाखल करणार आहोत. पाच हजारांवर शेतकरी वैयक्‍तिक दावे दाखल करतील.
- जैनुल सिद्दीकी, कार्याध्यक्ष, शेतकरी संघर्ष समिती, 
शेंबाळपिंपरी, ता. पुसद, यवतमाळ

यवतमाळ ः प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याचे पाहून त्रस्त पाच हजारांवर पीकविमाधारक शेतकऱ्यांनी अखेर न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स विमा कंपनीविरोधात हे शेतकरी दाद मागणार असून, इतक्‍या मोठ्या संख्येने शेतकरी न्यायालयाचे दार ठोठावण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. 

पुसद तालुक्‍यातील शेंबाळपिंपरी मंडळात १७ गावांचा समावेश आहे. या मंडळात सुमारे ९ हजार खातेदार आहेत. या सर्व ९ हजारांवर शेतकऱ्यांनी शासनाने नियुक्‍त केलेल्या रिलायन्स कंपनीमार्फत सोयाबीन व कपाशी पिकाचा विमा उतरविला. दरम्यान, गेल्या हंगामात सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने त्याच्या भरपाईची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. विमा कंपनीने भरपाई दिली देखील, परंतु विमा रक्‍कमवाटपात भेदभाव केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

काही गावातील शेतकऱ्यांना १८३७ रुपयांप्रमाणे भरपाई देण्यात आली, तर काही गावांतील शेतकऱ्यांना ९ हजार ६०० रुपयांप्रमाणे भरपाई देण्यात आली. विमा भरपाईबाबतच्या या अन्यायकारक धोरणाविरोधात शेतकऱ्यांनी कृषी विभाग, तहसीलदार, विमा कंपनी, जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत भूमिका मांडली. परंतु न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता कोर्टातूनच न्याय मिळविण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्‍त केला. 

मुख्यमंत्र्यांकडूनही तोडगा नाही
यवतमाळचे पालकमंत्री व ऊर्जामंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत हा प्रश्‍न नेण्यात आला. परंतु त्यानंतरही याप्रकरणात तोडगा निघू शकला नाही. परिणामी, तब्बल पाच हजारांवर शेतकऱ्यांनी रिलायन्स विरोधात आता ग्राहक मंचात जाण्याचा निर्णय घेतला. नांदेड येथील विष्णू पाटील हे शेतकऱ्यांची भूमिका ग्राहक मंचात मांडत आहेत. सातबारा व विमा भरल्याची पावती प्रकरणासोबत जोडत हे शेतकरी वैयक्‍तिक प्रकरण दाखल करतील

इतर अॅग्रो विशेष
गहू पिकाचे जनुकीय विश्लेषण, सुसंगत...आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने गहू पिकाचे...
वऱ्हाडात पावसाचे जोरदार पुनरागमनअकोला  : दोन दिवस उसंत घेतल्यानंतर वऱ्हाडात...
खान्‍देशात जोरदार पाऊसजळगाव : खानदेशात मागील २४ तासांत अनेक ठिकाणी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाने...
शासनाच्या नव्या निर्णयाचा महाबीज,...अकोला ः महाबीज आणि राष्ट्रीय बीज निगम यांच्या...
बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम...मुंबई: राज्याला बियाणे उत्पादनात स्वयंपूर्ण...
राज्यातील धरणांमध्ये ५९ टक्के पाणीसाठापुणे : सह्याद्रीच्या घाटमाथ्यासह, मध्य...
बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत बांधणी...मुंबई: राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या...
‘ग्लायफोसेट’ला पर्याय काय? पुणे ः ग्लायफोसेट मानवी आरोग्य व पर्यावरणाला...
सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ....मुंबई : राज्यातील शेतीक्षेत्रात रासायनिक खतांचा...
ग्लॅडिअोलस, गुलछडीतून दरवळला यशाचा सुगंधतांत्रिक शिक्षणाचा पुरेपुर वापर, नावीन्यांचा शोध...
‘बकरी ईद’चे उद्दिष्ट ठेवून बोकड संगोपन...बकरी ईदच्या सणाचे उद्दिष्ट ठेवत पुणे जिल्ह्यातील...
विदर्भात दणका; मराठवाड्यात जोरदारपुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाने...
तेलंगणातही आढळली लष्करी अळी हैदराबाद ः लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने भारतासह...
केरळला २६०० कोटींचे पॅकेज द्या :...तिरुअनंतपूरम ः पुरामुळे केरळचे प्रचंड प्रमाणात...
केळी उत्पादकांना विमा परतावा सात...जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत जळगाव...
...तर दूध उत्पादकांना २५ रुपये दर देणे...पुणे: राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर...
गुणवत्तेच्या नावाखाली दूधदर कपातीचा...मुंबई : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी...
काळी आई आणि तिच्या लेकरांवर प्रेम करा४ ऑगस्टच्या ‘अॅग्रोवन’मध्ये तीस वर्षे सतत फ्लॉवर...
युरियाचा वापर हवा नियंत्रितचपंधरा दिवसांच्या उघडिपीनंतर राज्यात पावसाने दमदार...