agriculture news in marathi, Five villages with Anjani are without water | Agrowon

अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

सांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण टंचाईची स्थिती आहे. अंजनी तलावाखाली पाणी योजना पूर्णपणे बंद आहेत. अंजनीसह पाच गावांच्या पाणी योजना बंद असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. अंजनी तलावात पाणी नसल्याचा फटका अंजनी, डोंगरसोनी, वडगाव, नागेवाडीला बसत आहे.

सांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण टंचाईची स्थिती आहे. अंजनी तलावाखाली पाणी योजना पूर्णपणे बंद आहेत. अंजनीसह पाच गावांच्या पाणी योजना बंद असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. अंजनी तलावात पाणी नसल्याचा फटका अंजनी, डोंगरसोनी, वडगाव, नागेवाडीला बसत आहे.

माजी उपमुख्यमंत्री आर. आर. आबा पाटील यांच्यानंतर गावाची पाण्याबाबतीत आबाळ सुरू झाली आहे. तिच अवस्था परिसराची आहे. खुद्द अंजनी येथे वीस दिवस पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. तलावातून गावाला पाणीपुरवठा
होतो. मात्र, तिथे पाणीच नसल्याने योजना बंद आहे. काही कूपनलिका, विहिरींतून होणारा पाणीपुरवठाही बंद झाल्याने ग्रामपंचायत दोन टॅंकरने पाणी पुरवण्याचा प्रयत्न करीत आहे.

तहसीलदारांना पत्र देऊन ग्रामपंचायतीने टॅंकर सुरू करण्याची मागणी केली आहे. जिल्हा ‘टॅंकरमुक्‍त’ असल्याने टॅंकर देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत आहे. दरम्यान, अंजनीतील ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देऊन घागर मोर्चाचा इशारा दिला आहे.

अशीच स्थिती डोंगरसोनी, वडगाव, नागेवाडी येथेही आहे. अंजनी तलावात पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्याच्या योजना ठप्प आहेत. यावर्षी सुरवातीपासूनच पाऊस कमी झाला. विहिरी, कूपनलिकांनाही पुरेसे पाणी न आल्याने दूर अंतरावरून ग्रामस्थ पाणी मिळवत आहेत. अंजनी तलावातून सावळजसाठी केलेली पाणी योजनाही बंद आहे. सुदैवाने सिद्धेवाडी तलावातून पाणी मिळत असल्याने सावळजकरांची तीव्र टंचाईत दिलासा मिळाला आहे.

‘तासगाव पूर्व’ची नेहमी होरपळ
काही वर्षे ‘म्हैसाळ’मधून अंजनी तलावात पाणी सोडले जात होते. दुष्काळाची दाहकता जाणवत नव्हती. मात्र आर. आर. आबा पाटील यांच्यानंतर अंजनी तलावात पाणी सोडण्यासाठी खूप धडपड करावी लागत आहे. सलग दुसऱ्या वर्षी पिण्याच्या व शेतीच्या पाण्याबाबतीत परवड सुरू झाली आहे.

इतर ताज्या घडामोडी
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...
व्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...
चारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...
आंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...
मापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर  : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...
तीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...
उन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव  ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...
पाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...
हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्‍मीरमधील...
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...