agriculture news in marathi, flood situation in solapur, maharashtra | Agrowon

सोलापूर जिल्ह्यातील भीमा, सीना नद्यांकाठी पूरसदृश स्थिती
सुदर्शन सुतार
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

सोलापूर  ः पुणे जिल्ह्याकडून उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राकडे सुरू असलेला विसर्गामुळे धरणातून भीमेत पुन्हा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्याशिवाय पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नीरा, सीना आणि भोगावती या जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्याही दुथडी भरून वाहत असल्याने पूरसदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराची खबरदारी म्हणून प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पण परिस्थिती नियंत्रणात आहे.

सोलापूर  ः पुणे जिल्ह्याकडून उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राकडे सुरू असलेला विसर्गामुळे धरणातून भीमेत पुन्हा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्याशिवाय पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नीरा, सीना आणि भोगावती या जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्याही दुथडी भरून वाहत असल्याने पूरसदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराची खबरदारी म्हणून प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पण परिस्थिती नियंत्रणात आहे.

उजनी धरणातून भीमा नदीत ७० हजार क्‍युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. पण या पाण्यामुळे नदीच्या कार्यक्षेत्रातील बहुतेक सगळे बंधारे भरून वाहत आहेत.
त्याशिवाय वीर धरणातून नीरा नदीतही १४ हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात आल्याने भीमा नदीच्या पाणीपातळीमध्ये मोठी वाढ झाली असून, पूरस्थिती
निर्माण झाली आहे.

वीर धरणातून नीरा नदीत दोन दिवसांपासून विसर्ग सुरू आहे. त्यात मोठी वाढ करण्यात आली आहे. तसेच बारामती, फलटण, माळशिरस तालुक्‍यांतील पावसाचे पाणी नीरेत मिसळत असल्याने ही नदी दुथडी भरून वाहत आहे. हे पाणी पुढे भीमा नदीत मिसळत असल्याने संगमाच्या पुढे भीमा नदीला पूर आला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील सीना-कोळेगाव धरण ९६ टक्के भरले असून, या धरणातून सीना नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील
नदीकाठच्या गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी, मलिकपेठ येथील बंधाऱ्यांच्या स्लॅबला लागून पाणी वाहत असून,
आणखी पाणी वाढल्यास हे बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्‍यता आहे.

तसेच गेले दोन दिवस उस्मानाबाद जिल्हा व बार्शी तालुक्‍यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने बार्शी तालुक्‍यातील हिंगणी व ढाळे पिंपळगाव हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. या प्रकल्पातून भोगावती नदीत पाणी सोडण्यात आल्याने भोगावती नदीलाही पूर आला आहे.

एकीकडे धरणातून पुढे भीमा नदीत पाणी सोडण्यात येत असल्याने पूरस्थितीवर काहीसे नियंत्रण येत असले, तरी उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्गही
काही कमी नाही. तोही जवळपास ५० हजार क्‍युसेकने वाढलेला आहे. शुक्रवारी बंडगार्डनकडून उजनीमध्ये १८,९७० क्‍युसेक आणि दौंडकडून ३४,६८८ क्‍युसेक
इतके पाणी सोडण्यात येत होते. तरीही धरणाची पातळी स्थिर होती. शुक्रवारी दुपारी धरणामध्ये एकूण पाणीसाठा १२१.६९ टीएमसी आणि पाण्याची टक्केवारी १०८.३० टक्के इतकी होती.

गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळी जिल्ह्यातील काही भागांत पावसाने हलकी हजेरी लावली. त्यात पुन्हा जोर नव्हता. सोलापूर जिल्ह्यात पाऊस नसला तरी नजीकच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे जिल्ह्यात मात्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. पण शुक्रवारी ती काहीशी नियंत्रणात आली.

इतर ताज्या घडामोडी
फळपीक सल्ला : लिंबूवर्गीय फळ, केळी लिंबूवर्गीय फळ पीके मृग बहराची फळे काढणी...
तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढीचा अादेश...नागपूर : यापूर्वी निर्धारित केलेले अटी व नियम...
सीताफळ पीक सल्लासीताफळ हे पीक पावसावर घेतले जाते. मात्र,...
नेदरलॅंड फळ बाजारात ब्राझीलचे वर्चस्वगेल्या काही वर्षांमध्ये आंबा, लिंबू आणि...
चालण्याचा व्यायाम आरोग्यासाठी फायद्याचाआरोग्यासाठी व्यायामाची आवश्यकता कोणीही नाकारत...
पूर्वहंगामी कापूस लागवडीला बसणार फटका जळगाव  ः गुलाबी बोंड अळीचा धसका आणि...
कोकणवर अन्याय करणाऱ्यांची राखरांगोळी...नाणार  : नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, नाणार...
रणरणत्या उन्हातील धान्य महोत्सवाकडे...नागपूर  ः विदर्भाचा उन्हाळा राज्यात सर्वदूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाख टन खते उपलब्ध...पुणे : जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली...
अकोला जिल्ह्यात १०३२ शेततळ्यांची कामे... अकोला ः पीकउत्पादन वाढीसाठी शाश्वत पाणीस्रोत...
मराठवाड्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या... औरंगाबाद  : गत आठवड्याच्या तुलनेत...
परभणीत‘शेतमाल तारण योजने अंतर्गत ४०... परभणी  ः परभणी कृषी उत्पन्न बाजार...
नगर जिल्ह्यात १७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा नगर ः जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या...
परभणीत खरिपात सोयाबीन, मूग, तुरीचे... परभणी  : जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगरमधील २ लाख ४७ हजार शेतकऱ्यांना... नगर ः राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर...
नाशिक विभागातील ११०० गावांची "जलयुक्त... नाशिक : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी...
सार कसं सामसूम तरंग नाही तलावात...शेती कोरडवाहू. तरीही स्वबळावर दुग्ध व्यवसायातून...
बालिकांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून ‘पॉक्‍सो’ कायद्यात...
पुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...