agriculture news in marathi, flow of 'Mhaysal' scheme has stopped | Agrowon

‘म्हैसाळ’ योजनेचा उपसा थांबला
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 जुलै 2018

सांगली : म्हैसाळ योजनेचा उपसा थांबवण्यात आला अाहे. दीड महिन्यांत योजनेतून तब्बल पाच टीएमसी पाण्याचा उपसा झाला. मिरजेसह पाच तालुक्‍यांतील वीस हजार हेक्‍टर शेतीला पाणीपुरवठा झाला. या दरम्यान या योजनेची अडीच कोटींची पाणीपट्टी वसूल झाली आहे.

सांगली : म्हैसाळ योजनेचा उपसा थांबवण्यात आला अाहे. दीड महिन्यांत योजनेतून तब्बल पाच टीएमसी पाण्याचा उपसा झाला. मिरजेसह पाच तालुक्‍यांतील वीस हजार हेक्‍टर शेतीला पाणीपुरवठा झाला. या दरम्यान या योजनेची अडीच कोटींची पाणीपट्टी वसूल झाली आहे.

जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने आणि पाण्याची मागणी कमी झाल्याने मोटारी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने थकबाकीपोटी पंधरा कोटी रुपये दिल्यानंतर २४ मार्च रोजी उपसा सुरू करण्यात आला होता. किरकोळ बिघाड वगळता उपसा अखंड सुरू राहिला. म्हैसाळ योजनेच्या असणाऱ्या एकूण १०३ पंपांपैकी अगदी ८० पंप सक्षमपणे सुरू राहिले. तीनही महिन्यांत ७० ते ७८ ची पंपसंख्या सरासरीने राहिली आहे. यापूर्वी ती फक्त ६५ पर्यंत जाऊ शकली होती. सर्व पंप सरासरी ८०० ते ११०० अश्‍वशक्ती इतक्या क्षमतेचे असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी उपसता आले.

मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, जत व सांगोला तालुक्‍यांत पाणी गेले. १०३ दिवसांच्या उपशानंतर पंपांना विश्रांती देण्यात आली. या कालावधीत वारणेचे पाच टीएमसी पाणी वापरण्यात आले. जूनअखेरचे वीजबिल वीस कोटी रुपयांवर गेले आहे. पैकी ८१ टक्के रक्कम शासन देणार आहे. उर्वरित १९ टक्के शेतकऱ्यांना भरावे लागतील. ही रक्कम चार कोटी रुपये होते.

मार्चपासून शेतकऱ्यांनी अडीच कोटी रुपये जमा केले आहेत. पाणी पिण्यासाठी सोडले असल्याने त्याचे सुमारे साडेतीन कोटी रुपये शासनाकडून मिळतील. चार कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे. यंदाच्या उपशाची वसुली सुमारे ऐंशी टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण झाल्याने पुढील हंगामात मागणी करताच आवर्तन सुरू होणार आहे.

‘उपसा थांबल्याने योजनेच्या देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत. सर्व पंप, आरग, बेडग आणि सलगरे कालवे यांची दुरुस्ती केली जाणार आहे. वितरिका व पोटकालव्यांवर व्हॉल्व्ह बसवले जातील. कालव्यांची गळती शंभर टक्के बंद करण्याचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांसह सर्वांच्या सहकार्याने आवर्तन यशस्वी करता आले. यंदा वसुली चांगली झाल्याने पुढील आवर्तन वेळेत सुरू होऊ शकते.’
-एस. एम. नलवडे, कार्यकारी अभियंता

असे झाले आवर्तन
वीस हजार हेक्‍टर शेती ओलीताखाली
मेअखेरचे वीजबिल पंधरा कोटी रुपये
शेतकऱ्यांनी भरले अडीच कोटी रुपये
शासनाकडून साडेतीन कोटी येणे

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...