औरंगाबादेत फ्लाॅवर प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये

फ्लाॅवर
फ्लाॅवर

औरंगाबाद : येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२८) फ्लॉवरची ४७ क्‍विंटल आवक झाली. या फ्लॉवरला ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ९३ क्‍विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ४०३ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर १००० ते २४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. टोमॅटोची आवक १०७ क्‍विंटल तर दर ७०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १६ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला २००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १४ क्‍विंटल आवक झालेल्या गवार शेंगांचे दर ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ४४ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ४ क्‍विंटल आवक झालेल्या वालशेंगाचा दर ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २० क्‍विंटल आवक झालेल्या मकाला ५०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २२ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीचे दर ५०० ते १२०० रूपये प्रतिक्‍विंटल राहिला. ४७ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबाला १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १० क्‍विंटल आवक झालेल्या कारल्याचा दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला.  दुधी भोपळ्याची आवक १३ क्‍विंटल झाली. दुधी भोपळ्याला १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६४ क्‍विंटल आवक झालेल्या पत्ता कोबीचा दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ढोबळ्या मिरचीची आवक ३८ क्‍विंटल तर दर ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १८ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ६०० ते ८०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. १७ हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकचे दर ४०० ते ६०० रुपये प्रतिशेकडा तर १८ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबीरचे दर ५०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com