परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये

फ्लाॅवर
फ्लाॅवर

परभणी : कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ८) फ्लाॅवरची ७० क्विंटल आवक झाली होती. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. वांग्याची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची ७०० क्विंटल आवक, तर प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये दर होते. हिरव्या मिरचीची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १३०० रुपये दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाला. गवारीची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाला. पालकाची ३० क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये मिळाला. शेपूची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर मिळाला. थीच्या ५० हजार जुड्यांची आवक असताना प्रतिशेकडा १०० ते २५० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची ६५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २०० ते ८०० रुपये दर मिळाला. भेंडीची १२ क्विंटल आवक असतांना ५०० ते १५०० रुयये प्रतिक्विंटल दर मिळाला. कोबीची ३५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाला. कारल्याची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाला. दोडक्याची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाला. काकडीची ३० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाला. दुधी भोपळ्याची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाला. गाजराची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com