फुलांच्या नयनरम्य सजावटीने कोल्हापुरात पुष्प प्रदर्शनास प्रारंभ

पुष्प प्रदर्शनास प्रारंभ झाला
पुष्प प्रदर्शनास प्रारंभ झाला

कोल्हापूर ः पर्यटनवाढ आणि शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे वळावे, या उद्देशाने येथील पोलिस उद्यानात आयोजित पुष्प प्रदर्शनास रविवारी (ता. २४) प्रारंभ झाला.  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. २८ डिसेंबरपर्यंत हा महोत्सव सर्वांसाठी मोफत खुला राहणार आहे. कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पाच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. फुलांनी सजविलेल्या वेगवेगळ्या प्रतिकृती नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. यापैकी काही फुलझाडे याच ठिकाणी तयार करण्यात आली आहेत, तर उर्वरित फुले जिल्ह्यातील ग्रीन हाऊस, व शेतकऱ्यांच्या शेतीमधून आणण्यात आली आहेत.  महोत्सवात शंभरहून अधिक प्रकारच्या अडीच लाखांहून अधिक फुलांचा समावेश आहे. त्याशिवाय विविध प्रकारच्या फुलझाडांचाही समावेश आहे. बारा बाय चोवीस फुटाची राजर्षी शाहू व धरणाची प्रतिकृती, चोवीस फुटाचे विमान, चोवीस फुटी हत्ती, चौदा फुटांची शकुंतला या प्रतिकृतीही लक्षवेधी आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com