agriculture news in Marathi, flower rates risen in solapur, Maharashtra | Agrowon

सोलापुरात फुलबाजारात तेजी
सुदर्शन सुतार
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

दसऱ्यानंतर पहिल्यांदाच झेंडूला पुन्हा एकदा उठाव मिळाला. दसऱ्यामध्ये झेंडूला प्रतिकिलोसाठी ८० ते १०० रुपये असा दर मिळाला; पण या सप्ताहात दिवाळीमुळे झेंडूचा दर १०० ते १२० रुपयांपर्यंत वधारला. 

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात दिवाळीमुळे फुलबाजार चांगलाच तेजीत राहिला. विशेषतः झेंडू, गुलाब आणि शेवंतीला सर्वाधिक उठाव मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात झेंडूची १०० ते २०० क्विंटलपर्यंत असणारी आवक एक-दोन गाड्यांपर्यंत झाली; तर गुलाब आणि शेवंतीची प्रत्येकी एक गाडीपर्यंत आवक झाली. गेल्या काही दिवसांत अगदी काही मोजकी असणारी आवक या सप्ताहात चांगलीच वाढली. सप्ताहाच्या सुरवातीलाच दिवाळीचा उत्सव सुरू झाल्याने फुलांना मागणी वाढली.

सप्ताहाच्या शेवटपर्यंत फूलबाजार त्यामुळे तेजीत राहिला. दसऱ्यानंतर पहिल्यांदाच झेंडूला पुन्हा एकदा उठाव मिळाला. दसऱ्यामध्ये झेंडूला प्रतिकिलोसाठी ८० ते १०० रुपये असा दर मिळाला; पण या सप्ताहात दिवाळीमुळे झेंडूचा दर १०० ते १२० रुपयांपर्यंत वधारला. 

शेवटच्या दोन दिवसांत लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला तर खूपच मोठी मागणी वाढली. त्याशिवाय गुलाबाला प्रतिकिलो ५० ते ८० रुपये आणि शेवंतीलाही ५० ते ७० रुपये असा दर मिळाला. भाजीपाल्यामध्येही कोथिंबिरीला सर्वाधिक उठाव मिळाला. त्यानंतर मेथी, शेपूचे भाव वधारलेले राहिले. 

भाज्यांची आवकही रोज जेमतेम आठ-दहा हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी २००० रुपये, मेथीला १५०० रुपये आणि शेपूला ७०० रुपयांपर्यंत दर मिळाला. फळभाज्यामध्ये टोमॅटो, वांगी, ढोबळी मिरचीला पुन्हा उठाव मिळाला. फळभाज्यांची आवक स्थानिक भागातूनच झाली. रोज त्यांची प्रत्येकी एक-दोन गाड्या अशी आवक झाली.

टोमॅटोला प्रतिदहा किलोसाठी १५० ते २५० रुपये, वांग्याला १०० ते १७० रुपये आणि ढोबळी मिरचीला १५० ते ३०० रुपये असा दर मिळाला. कांद्याचे दर याही सप्ताहात टिकून पण तेजीत राहिले. कांद्याची आवकही पुन्हा कमीच होती. रोज ५० ते ६० गाड्या इतकी आवक झाली. कांद्याला प्रतिक्विंटल किमान २०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपये असा दर मिळाला.

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...
नगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर  ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...
वाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम  ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...
खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा  : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...