agriculture news in marathi, Flower waiting in Aurangabad 800 to 1000 rupees | Agrowon

औरंगाबादेत फ्लॉवर प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपये
टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ९) फ्लॉवरची ५४ क्विंटल आवक झाली. त्याला ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ९) फ्लॉवरची ५४ क्विंटल आवक झाली. त्याला ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची १३५ क्विंटल आवक झाली. तिला २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. कांद्याची आवक ९५४ क्विंटल, तर दर १०० ते ५७५ रुपये प्रतिक्विंटल,  टोमॅटोची आवक १७७ क्विंटल, तर दर ५०० ते १७०० रुपये,  वांग्याची ४१ क्विंटल आवक, तर दर ५०० ते ८०० रुपये, काकडीची १४ क्विंटल आवक, तर दर १२०० ते २००० रुपये  मिळाला. १७४ क्विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीला ६०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १५ क्विंटल आवक झालेल्या लिंबूला १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल चा दर मिळाला.

गाजराची १५३ क्विंटल आवक झाली. त्याला ५०० ते १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ९० क्विंटल आवक झालेल्या पपईला ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.२३ क्विंटल आवक झालेल्या शेवग्याचे दर १५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ६ क्विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याचा दर १००० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ढढोबळ्या मिरचीची ३७ क्विंटल, तर २००० ते २५०० रुपये, वाल शेंगांची ३ क्विंटल आवक, तर दर १००० ते १८०० रुपये, कारल्याची आवक ९ क्विंटल, तर दर ३००० ते ४५०० रुपये,  मोसंबीची आवक ३५ क्विंटल, तर दर ५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

९० क्विंटल आवक झालेल्या डाळिंबाचे दर ३०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ३४० क्विंटल आवक झालेल्या वाटण्याला १३०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल चा दर मिळाला. १२ हजार जुडयांची आवक झालेल्या मेथीला २०० ते ३०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. ८५०० जुड्यांची आवक झालेल्या पालकला १०० ते २०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १३ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला २०० ते ३०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सदस्यांनी दिली.

इतर बाजारभाव बातम्या
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
जळगाव : कांदा दरात किंचित सुधारणा,...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
अकोल्यात हरभरा प्रतिक्विंटल ३९०० ते...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
चिंचेचे दर दबावातसरुड, जि. कोल्हापूर : खुटाळवाडी (ता. शाहूवाडी)...
जळगावात गवार, हिरवी मिरची तेजीतजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात मेथी, शेपू, कोथिंबिरीचे दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत काकडी १२०० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ३००० ते...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ४०० ते ३०००...नाशिकला प्रतिक्विंटल १२०० ते ३००० रुपये नाशिक :...
सांगलीत गूळ प्रतिक्विंटल २८५० ते ३६३०...सांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाची आवक कमी...
परभणी बाजार समितीमध्ये कापूस दरात...परभणी ः कापूस खरेदी हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये...
कोल्हापुरात टोमॅटो प्रतिक्विंटल ५०० ते...कोल्हापूर : येथील बाजार समितीत मंगळवारी टोमॅटोची...
गहू दरांवर दबाव, मका दरात वाढ शक्‍यजळगाव ः खानदेशातील मोजक्‍याच बाजार समित्यांमध्ये...
कळमणा बाजारात गव्हाची आवक २५०० क्‍...नागपूर ः कळमणा बाजार समितीत गव्हाची वाढती आवक...
बोरी बाजार समितीत हळदखरेदीस प्रारंभबोरी, जि. परभणी ः बोरी (ता. जिंतूर) येथील कृषी...
दुष्काळी स्थितीमुळे भाजीपाल्याची आवक...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची २००० ते ३६००...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत मेथी प्रतिशेकडा ४०० ते ५०० रुपयेपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
जळगाव जिल्ह्यात भेंडीच्या आवकेत वाढ, दर...जळगाव : भेंडीची आवक वाढत आहे. उठाव कायम असल्याने...