agriculture news in marathi, fluoride found in Yavatmal at 500 water source | Agrowon

यवतमाळमध्ये पाण्याचे पाचशे स्रोत ‘फ्लोराईड’मिश्रित
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

यवतमाळ  : जिल्ह्यातील फ्लोराईडमिश्रित जलस्रोतांच्या संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. २०१७-१८ मध्ये मॉन्सूनपूर्व केलेल्या रासायनिक तपासणीत ही बाब उघड झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत तपासणीत १५० स्रोतांची भर पडल्याने प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यातील अनेक गावांत फ्लोराईडयुक्त जलस्रोत मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात सर्वाधिक स्रोत पांढरकवडा, झरी, मारेगाव, पांढरकवडा, महागाव, उमरखेड व राळेगाव तालुक्‍यांतील काही भागांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात मार्च ते एप्रिल मॉन्सूनपूर्व रासायनिक तपासणी करण्यात आली.

यवतमाळ  : जिल्ह्यातील फ्लोराईडमिश्रित जलस्रोतांच्या संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. २०१७-१८ मध्ये मॉन्सूनपूर्व केलेल्या रासायनिक तपासणीत ही बाब उघड झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत तपासणीत १५० स्रोतांची भर पडल्याने प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यातील अनेक गावांत फ्लोराईडयुक्त जलस्रोत मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात सर्वाधिक स्रोत पांढरकवडा, झरी, मारेगाव, पांढरकवडा, महागाव, उमरखेड व राळेगाव तालुक्‍यांतील काही भागांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात मार्च ते एप्रिल मॉन्सूनपूर्व रासायनिक तपासणी करण्यात आली.

यंदा मोबाईल ॲपद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. परिणामी, साडेसात हजारांवर पाण्याचे नमुने घेण्यात आलेत. पूर्वी साडेपाच हजारांच्या जवळपास नमुने तपासले जात होते. त्यात ३५० नमुन्यांत फ्लोराईड आढळून आले. त्यानंतर ऑक्‍टोबर ते डिसेंबरदरम्यान जिल्ह्यातील साडेआठ हजार पाणी नमुने घेण्यात आलेले आहेत. त्यांची प्रयोगशाळेत तपासणी सुरू आहे. या वेळी नमुने वाढल्याने फ्लोराईडयुक्त जलस्रोत्रांचे नमुनेही वाढले आहेत.  

३७ रुग्णांवर उपचार
फ्लोराईडयुक्त जलस्रोत असलेल्या घाटंजी तालुक्‍यातील खैरगाव येथील ३७ रुग्णांना सावंगी मेघे येथील विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. फ्लोराईडमुळे त्यांना हाडांचे आजार जडले आहेत. दात व हाडे ठिसूळ होणे आदींचा त्रास त्यांना जाणवत आहे.

निंगनूर सर्कलमध्ये ३५ रुग्ण
आरोग्य विभागाने जिल्ह्यात सर्वेक्षण केले. त्यात उमरखेड तालुक्‍यातील निंगनूर सर्कलमधील अनेक गावांत रुग्ण आढळून आलेत. विशेष म्हणजे, गमापूर गावातील रामकिशन जाधव यांचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर केलेल्या तपासणी सर्कलमध्ये ३५ रुग्ण समोर आलेले आहेत.

आर्णी, वणी व घाटंजी या तालुक्‍यांत फ्लोराईडमिश्रिम पाण्याची मोठी समस्या आहे. पाण्यामुळे नागरिकांना हाडांचे, दातांचे विविध आजार होत आहेत. नागरिकांना शुद्धपाणी मिळावे, यासाठी फिल्टर प्लांट आवश्‍यक आहे. काही ठिकाणी ते बसविले असले, तरी देखभाल व्यवस्थित होत नसल्याचे निर्दशनास आले आहे. याबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. आज आमच्याकडे ३७ रुग्ण दाखल झाले आहेत.
- डॉ. अभ्युदय मेघे, सीईओ,
विनोबा भावे ग्रामीण वैद्यकीय रुग्णालय, सावंगी मेघे.

ज्या गावांमध्ये दूषित पाण्याचे स्रोत आहेत, त्या गावांत शुद्ध पाण्यासाठी आर. ओ. एटीएम युद्धपातळीवर बसविण्यात येणार आहेत. पांढरकवडा तालुक्‍यातील खैरगाव (बुद्रुक) येथील काही लोकांना किडनीचे आजार झालेत. त्यामुळे त्या ठिकाणी शासनाने तातडीने शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. शासन सर्व गावांना शुद्ध पाणी पुरविण्यास कटिबद्ध आहे.
- किशोर तिवारी, अध्यक्ष,
शेतकरी स्वावलंबन समिती, राज्य सरकार.

 

इतर बातम्या
‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री...पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे,...
विधान परिषदेत शिवसेनेला 'लॉटरी'; कोकणात...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या...
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
कोकणात शनिवारपासून पाऊस?पुणे : अरबी समुद्रात अालेले ‘मेकुणू’ चक्रीवादळ...
‘मेकुणू’ चक्रीवादळ होणार अतितीव्रपुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या ‘मेकुणू’...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
खरिपासाठी पैशांची तजवीज करण्यात शेतकरी...अकोला  ः अागामी हंगामाला अाता अवघा...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
सेस वसुलीच्या मुद्यावर प्रशासन, जळगाव...जळगाव ः भाजीपाला व फळे नियमनमुक्त केल्याने...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
यंदा वापरा घरचेच सोयबीन बियाणेपुणे : राज्यात गेल्या हंगामात झालेल्या अवेळी...