agriculture news in marathi, FM reveals formula for fixing MSP 50% over production cost | Agrowon

शेतीमालाला दीडपट हमीभाव २०१९ च्या खरिपापासून
टीम अॅग्रोवन
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफ्यावर आधारित हमीभाव देणार आहे. हा हमीभाव जाहीर करताना सरकार कृषी निविष्ठांची वास्तविक किंमत आणि कुटुंबातील सदस्यांची मजुरी विचारात घेणार आहे. या सूत्रानुसार काढलेला हमीभाव शेतकऱ्यांना २०१९ च्या खरिपापासून दिला जाईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिली.  

नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफ्यावर आधारित हमीभाव देणार आहे. हा हमीभाव जाहीर करताना सरकार कृषी निविष्ठांची वास्तविक किंमत आणि कुटुंबातील सदस्यांची मजुरी विचारात घेणार आहे. या सूत्रानुसार काढलेला हमीभाव शेतकऱ्यांना २०१९ च्या खरिपापासून दिला जाईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिली.  

सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात २०१९ च्या खरिपापासून शेतीमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा असा हमीभाव देण्याची घोषणा केली होती. परंतु उत्पादन खर्च कसा काढणार? मजुरीचा समावेश असेल का? त्यासाठी कोणते सूत्र वापरणार अशी विचारणा विरोधकांकडून केली जात होती. तसेच तज्ज्ञांनीही याबाबतचे सूत्र जाहीर करण्याची मागणी केली होती. राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत उत्तर देताना अर्थमंत्री जेटली यांनी ही माहिती दिली. 

सध्या सरकार २३ पिकांचा हमीभाव ठरविते. अर्थमंत्री म्हणाले, की हमीभाव ठरविसाठी उत्पादन खर्च काढण्यासाठी सरकार A2+FL (वास्तविक निविष्ठांचा लागलेला खर्च अधिक कुटुंबातील सदस्यांची मजुरी) सूत्र वापरणार आहे. सध्या सरकार हमीभाव ठरवत असले तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. त्यामुळे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची तरतूद केली आहे. हमीभाव ठरविताना कृषी निविष्ठा खर्च आणि मजुरीचा खर्च विचारात घेताला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना A2+FL सूत्रानुसार आलेला खर्च आणि ५० टक्के नफा दिला जाणार आहे.

सध्या असा ठरतो हमीभाव

  • सध्या शेतीमालाचा हमीभाव हा कृषी खर्च आणि किंमत आयोग (सीएसीपी) ठरविते. सीएसीपी त्यासाठी तीन सूत्रांचा अवलंब करते ः A2, A2+FL आणि C2. 
  • A2 मध्ये उत्पादन करताना नकद आणि इतर केलेला खर्चाचा समावेश आहे (बियाणे, खते, कीडनाशके, मजूर, इंधन आणि सिंचन आणि इतर)
  • A2+FL मध्ये विस्तविक केलेला खर्च अधिक कुटुंबातील सदस्यांची मजुरीचा समावेश आहे. 
  • C2 मध्ये स्वतःच्या जमीन आणि स्थिर भांडवली मालमत्तेवर गेलेले भाडे आणि व्याज याचा समावेश आहे.

इतर अॅग्रो विशेष
उत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व...
सेसवसुली नव्हे; सर्रास लूटजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...
‘मेकुणू’ चक्रीवादळ होणार अतितीव्रपुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या ‘मेकुणू’...
कोकणात शनिवारपासून पाऊस?पुणे : अरबी समुद्रात अालेले ‘मेकुणू’ चक्रीवादळ...
खरिपासाठी पैशांची तजवीज करण्यात शेतकरी...अकोला  ः अागामी हंगामाला अाता अवघा...
सेस वसुलीच्या मुद्यावर प्रशासन, जळगाव...जळगाव ः भाजीपाला व फळे नियमनमुक्त केल्याने...
यंदा वापरा घरचेच सोयबीन बियाणेपुणे : राज्यात गेल्या हंगामात झालेल्या अवेळी...
प्रयोगशील कांदा शेतीत ठळक अोळख मिळवलेले...नाशिक जिल्हा कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. त्यातही...
गोकुळानं ‘गणित’ नाही मांडलंपशुपालनातून दूध व्यवसाय म्हणजे मुळातच उद्योग आहे...
ब्राझीलचा धडा घेणार कधी?सातत्याने दोन वर्षांच्या चांगल्या पाऊसमानानंतर...
उत्तर प्रदेशातील कारखान्यांची अतिरिक्त...नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि...
भारतात गोड्या पाण्याची उपलब्धता घटलीवॉशिंग्टन ः भारतात उपलब्ध पाण्याचा आणि पाणी...
कापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला...नगर  ः बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि...
अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकीपुणे  : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य...
वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात...पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ...
हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर...बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे...
दापोलीत उद्यापासून जॉइंट ॲग्रेस्कोपुणे ः यंदा ४६ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास...