agriculture news in marathi, FMD vaccine not available in state worries farmers | Agrowon

लाळ्या खुरकूतने जनावरे बेहाल
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

 पशुपालकांच्या खर्चात मोठी वाढ
 लसींच्या तुटवड्याने परिस्थिती गंभीर

पुणे : राज्यात विशेषत: ऊस पट्ट्यात सध्या जनावरांमध्ये लाळ्या खुरकूत रोगाने थैमान घातलेले असताना, लसीकरण न झालेल्या प्रादुर्भावग्रस्त भागात परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यातच औषधांचा काळाबाजार सुरू झाल्याने उपचारासाठी प्रतिजनावर दीड ते दाेन हजारांचा खर्च हाेत असल्याने पशुपालक त्रस्त झाले आहेत.

 पशुपालकांच्या खर्चात मोठी वाढ
 लसींच्या तुटवड्याने परिस्थिती गंभीर

पुणे : राज्यात विशेषत: ऊस पट्ट्यात सध्या जनावरांमध्ये लाळ्या खुरकूत रोगाने थैमान घातलेले असताना, लसीकरण न झालेल्या प्रादुर्भावग्रस्त भागात परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यातच औषधांचा काळाबाजार सुरू झाल्याने उपचारासाठी प्रतिजनावर दीड ते दाेन हजारांचा खर्च हाेत असल्याने पशुपालक त्रस्त झाले आहेत.

राज्यात सुमारे २ कोटी १० लाख जनावरे आहेत. या जनावरांना लाळ्या खुरकूतपासून संरक्षण मिळण्याकरिता साधारणत: सप्टेंबरमध्ये लसीकरण केले जाते. मात्र यंदा लसींच्या तुटवड्यांमुळे मोहीम बारगळल्यातच जमा आहे. लाळ्या खुरकूत विषाणूजन्य आजार असल्याने वेळीच लसीकरण केले, तरच त्याचा उपयोग होत असतो. मात्र, लसीकरण न झाल्याने सध्या राज्याच्या अनेक भागांत अचानक जनावर गंभीर आजारी होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थिती एेन वेळेस जनावर गंभीर आजारी होणे आणि त्याकरिता होणाऱ्या खर्चाने शेतकरी मेटाकुटीस येत आहे. महागडे दुधाळ जनावरे यास बळी पडत असल्याने दुग्ध व्यवसायासह शेतकऱ्यांचे अर्थकारणही प्रभावित होत आहे. 

गेल्या तीन वर्षांपासून सरकारी लसनिर्मिती जवळपास ठप्प झाल्याची माहिती समोर आली असून, खासगी कंपन्यांकडून होत असलेली खरेदीही अद्याप न झाल्याने लसीकरण मोहीम बंदच आहे. विधिमंडळातसुद्धा याबाबत प्रश्‍न उपस्थित करण्यात अाल्यानंतर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याचे जाहीर केले आहे. मात्र, सध्या निर्माण होत असलेली परिस्थिती आणि आमच्या नुकसानीला कोण जबाबदार आहे, असा प्रश्‍न पशुपालक विचारत आहे.  
 
याबाबत बाेलताना धनंजय धोर्डे (रा. डाेणगाव, ता. वैजापूर, जि. आैरंगाबाद) म्हणाले, ‘‘सध्या ऊसताेडणीचा हंगाम सुरू असल्याने राज्यातील विविध भागांत ऊसताेडणी मजुरांचे पशुधनासह स्थलांतर झाले आहे. स्थलांतरित झालेली जनावरे एकमेकांच्या सान्निध्यात आल्याने लाळ्या खुरकूतची लागण हाेऊन, साथीचा प्रसार झाला आहे. परिणामी स्थानिक पशुधनालादेखील त्याची लागण झाली असून, लाळ्या खुरकूत झाल्यानंतर लसीकरण केल्याने त्याचा अधिक त्रास पशुधनाला हाेत आहे. यामध्ये ताेंड लाल हाेणे, जिभेला काटे येणे, पाय वाकडे हाेणे आदी प्रकार हाेत आहेत. यावर उपचारासाठी प्रति पशुधन एक ते दाेन हजार रुपये खर्च येत असून, माझ्या व भावाच्या १८ जनावरांना २५ हजार रुपये खर्च झाला आहे. अशीच परिस्थिती विविध शेतकऱ्यांची असून, शासनाने तातडीने उपाययाेजना कराव्यात.’’

सध्या लसींचा तुटवडा असून, राज्याला १ काेटी ८० लाखांच्या डाेसची गरज आहे. हे डाेस लवकरच विविध जिल्हा आणि तालुका पातळ्यांवर उपलब्ध हाेतील. मात्र लसीकरणासाठी एवढ्या माेठ्या प्रमाणावर पैसे घेत असतील, तर त्याची तक्रार शेतकऱ्यांना स्थानिक पशुविकास अधिकाऱ्यांकडे करावी. त्या तक्रारींवर कारवाई केली जाईल.
- कांतिलाल उमाप, आयुक्त, पशुंसवर्धन

इतर अॅग्रो विशेष
पैशाकडेच जातोय पैसाभारतातील काही उद्योगपतींची संपत्ती एका वर्षात...
वाढवूया मातीचा कससंयुक्त राष्ट्रसंघाच्या २०११ च्या अन्न व कृषी...
जमीन आरोग्यपत्रिकेच्या गुणात्मक कामाकडे...पुणे  : राज्यात शेतकऱ्यांना जमीन...
'शुगरकेन हार्वेस्टर'ला अनुदान देण्यास...पुणे  : राज्यात ऊसतोडणीसाठी वापरल्या...
भरपाईबाबत समित्यांचे निष्कर्ष बियाणे...पुणे : राज्यात गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान...
कापूस पिकासाठी यवतमाळ जिल्हा पोषक नाहीनागपूर : यवतमाळ जिल्ह्यात उथळ ते मध्यम खोल जमिनी...
साडेचार लाख टन तुरीची महाराष्ट्रात...मुंबई  ः महाराष्ट्र हे देशात महत्त्वाचे तूर...
उस्मानाबाद ९.४ अंशांवरपुणे ः उत्तरेकडून थंड वारे कमी-अधिक प्रमाणात वाहत...
कृषीचा पतपुरवठा यंदा वाढण्याचे संकेतनवी दिल्ली ः देशातील शेतीसमोरील प्रश्न दिवसेंदिवस...
सीआयबीआरसी, कृषी, आरोग्य विभागावर...अमरावती ः विषबाधाप्रकरणी राज्य सरकारने नेमलेल्या...
खारपाणपट्ट्यात पेरू, लिलीसह बहुपीक शेतीखारपाणपट्ट्यात प्रयोगशील शेती करणे जिकिरीचे,...
वाया जाणारा भाजीपाला, शेणापासून...भाजीपाला व जनावरे बाजार यांच्यासाठी सातारा...
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
बीजी - ३ चे घोडे अडले कुठे?आगामी हंगाम धोक्‍याचा सन २०१७ च्या खरीप हंगामात...
आव्हान पाणी मुरविण्याचेठिबक सिंचन अनुदानासाठी यावर्षी विक्रमी निधी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्यनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला...
बोंड अळी भरपाईसाठी सुनावणी आजपासूनपुणे : राज्यात शेंदरी बोंड अळीमुळे...