शेतकरी कंपन्यांच्या क्षमतावृद्धीवर भर देणार

संरक्षित शेती, प्लॅस्टिक कव्हर याबाबत अधिक माहिती घेऊन नियोजन करणार आहोत. तसेच रोपवाटिकांचे क्‍लस्टर करण्यासंदर्भातही मार्ग काढला जाईल. - डॉ. एस. के. पटनायक , केंद्रीय कृषी सचिव
शेतकरी कंपन्यांच्या क्षमतावृद्धीवर भर देणार
शेतकरी कंपन्यांच्या क्षमतावृद्धीवर भर देणार

नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या क्षमतावृद्धीवर भर देण्याचे नियोजन केंद्र शासनाच्या पातळीवर सुरू झाले आहे. यासाठी देशभरात 100 कृषी विज्ञान केंद्रांवर त्या बाबत जबाबदारी देण्यात आली आहे. "सह्याद्री' हे या दृष्टीने आदर्श मॉडेल बनले आहे. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने इतर शेतकरी कंपन्यांना मजबूत करण्यासाठी पुढे यावे. त्यासाठीचे प्रशिक्षण केंद्र म्हणूनही सह्याद्रीला संधी देवू, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी सचिव डॉ. एस. के. पटनायक यांनी शनिवारी (ता. 11) केले.

सह्याद्री फार्म मोहाडी येथे शनिवारी आयोजित फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांच्या बैठकीत ते बोलत होते. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय सहसचिव दिनेश कुमार, वनाधिपती विनायकदादा पाटील, अशोक गायकवाड, श्रीराम शेटे, आमदार नरहरी झिरवाळ, दिलीप बनकर, कैलास भोसले, माणिकराव पाटील, रवींद्र पगार, सदाशिव शेळके, जगदीश होळकर आदी उपस्थित होते.

राज्यभरातून विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीला हजर होते. कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या मनोगतातून मागण्या मांडण्यात आल्या. शरद पवार यांनी या मागण्यांचा इंग्रजी अनुवाद करून सविस्तर माहिती पटनायक यांना दिली. शेतकरी कंपन्यांच्या वतीने योगेश थोरात, डॉ. कापसे, जगन्नाथ खापरे, रवींद्र बोराडे, माणिकराव पाटील, शहाजी सोमवंशी, सदाशिव शेळके , मधुकर गवळी, माधव पाचोरकर, अनिल शिंदे, कैलास भोसले यांनी मनोगते मांडली.

विलास शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सुनील वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले.

"नवीन द्राक्षवाणांच्या संशोधनावर भर' बांग्लादेशाने 100 टक्के आयात कर आकारल्यामुळे भारतीय द्राक्ष व्यापार अडचणीत आला आहे. बांग्लादेशाशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे त्याबाबत पाठपुरावा करता येईल. तसेच राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रामार्फत नव्या वाणांचे संशोधन करण्यासंदर्भात पाठपुरावा केला जाईल. भारतीय द्राक्षांबाबत क्‍लोरमेक्वाट क्‍लोराइड युरोपीय पेचात द्राक्ष उत्पादकांचे नुकसान झाले होते. त्यांना योग्य न्याय मिळण्यासाठी अपेडाचे अध्यक्ष डी. के. सिंग यांच्याशी चर्चा करू, असे पटनायक यांनी स्पष्ट केले.

डॉ. पटनायक म्हणाले

  • देशभरात फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांच्या क्षमतावृद्धीसाठी 100 कृषी विज्ञान केंद्रांना मान्यता. सह्याद्रीला क्षमतावृद्धी व प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता देणार
  • ई नामच्या मार्फत बाजार व्यवस्था मजबुतीवर भर. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला त्यासाठी जोडणे शक्‍य आहे.
  • राज्य पातळीवरील राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व केंद्र पातळीवरील राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ यांच्या योजनांचा समन्वय साधला जाईल.
  • भारतीय कृषी संशोधन परिषद आणि सर्व कृषी संशोधन केंद्रांमध्ये समन्वय साधू.
  • किमान अवशेष पातळीच्यासंदर्भात योग्य नियोजन केले जाईल. त्याबाबत यंत्रणाचा समन्वय अचूक व प्रभावी करण्यावर भर दिला जाईल.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com