agriculture news in marathi, Focus on the strengthening of agricultural education: Singh | Agrowon

कृषी शिक्षणाच्या बळकटीकरणावर भर : कृषिमंत्री सिंह
वृत्तसेवा
मंगळवार, 5 डिसेंबर 2017

नवी दिल्ली : तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगभरात मोठा बदल होत आहे. कृषी क्षेत्रातही बदलाचे वारे वाहत असून, कालानुरूप कृषी शिक्षणाला बळकट करण्यावर भर दिला जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी रविवारी (ता. 3) केले.

नवी दिल्ली : तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगभरात मोठा बदल होत आहे. कृषी क्षेत्रातही बदलाचे वारे वाहत असून, कालानुरूप कृषी शिक्षणाला बळकट करण्यावर भर दिला जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी रविवारी (ता. 3) केले.

बिहारमधील डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठात रविवारी आयोजित एका कार्यक्रमात कृषिमंत्री बोलत होते. कृषी शिक्षणाविषयी कृषिमंत्री म्हणाले, की माहिती तंत्रज्ञानाच्या अफाट वेगाने सर्व क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. शेतीही यापासून दूर राहू शकत नाही. अत्याधुनिक अवजारे, नवनवीन पद्धती आणि संगणकाद्वारे शेतीमध्येही बदलाचे वारे वाहत आहेत. याचा लाभ कृषी क्षेत्राला मिळावा म्हणून कृषी शिक्षणाचे या दृष्टीने बळकटीकरण केले पाहिजे. सरकारने ही बाब लक्षात घेऊन पाचव्या अधिष्ठाता समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कृषी शिक्षणाला व्यावसायिक दर्जा दिला आहे. तसेच नवीन, आधुनिक शेती पद्धती आणि तंत्रज्ञानाचा कृषी शिक्षणात वापर व्हावा, असाही प्रयत्न केला जात आहे.

अधिष्ठाता समितीच्या शिफारशीनुसार कृषी महाविद्यालयांमध्ये नवीन अभ्यासक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कृषी पदवीधारकांचा आत्मविश्‍वास वाढविणे आणि त्यांना शेती क्षेत्रात शेतकरीहितासाठी चांगले कार्य करण्याची संधी मिळवून देण्यात येत असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.

शाळेतील मुले आणि युवकांना कृषी शिक्षणाकडे आकर्षित करणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी 2013-14 च्या तुलनेत अर्थसंकल्पात कृषी शिक्षणासाठी 47.4 टक्‍क्‍यांनी निधी वाढविला आहे.
-राधामोहनसिंह, केंद्रीय कृषिमंत्री

कृषी पदवीधरांना भविष्यात मोठी संधी
कृषीतील उच्च गुणवत्ता शिक्षणासाठी नेमलेल्या पाचव्या अधिष्ठाता समितीने नुकताच अहवाल सादर केला आहे. सरकारने तो मंजूरही केला आहे. यामुळे कृषी आणि समकक्ष पदवीला व्यावसायिक (प्रोफेशनल) दर्जा मिळाला आहे. कृषी पदवीधारकांना भविष्यात याचा निश्‍चितच लाभ मिळणार आहे. कृषी पदवी ही आता अभियंता (इंजिनिअर) पदवीला असलेल्या दर्जाच्या बरोबर आहे. परिणामी देशासह परदेशात कृषी पदवीधरांना मोठी संधी मिळणार आहे, असे कृषिमंत्री सिंह यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...
दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...
शेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...
कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष? अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...
जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।।जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।। पंढरीचा...
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....