agriculture news in Marathi, fodder camp owner refuse to bar code tag and mobile scanning, Maharashtra | Agrowon

नगरमध्ये छावणीचालकांचा बारकोड टॅगिंग, मोबाईल स्कॅनिंगला विरोध
सुर्यकांत नेटके
रविवार, 12 मे 2019

नगर ः दुष्काळी परिस्थितीत जनावरे जगविण्यासाठी शासनाने चारा छावण्या सुरू केल्या. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार कार्यवाही करण्याबाबत प्रशासन सरसावले आहे. मात्र बुधवारपासून (ता. १५) नव्या नियमानुसार बारकोड, टॅगिंग, मोबाईल स्कॅनिंगला छावणीचालकांनी विरोध केला आहे.

 जिल्हाभरातील बऱ्याच राजकीय नेत्यांनीही छावणीचालकांची बाजू घेत प्रशासनाला निवेदने देणे सुरू केले आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये छावणीचालक व प्रशासनात संबंध ताणण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

नगर ः दुष्काळी परिस्थितीत जनावरे जगविण्यासाठी शासनाने चारा छावण्या सुरू केल्या. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार कार्यवाही करण्याबाबत प्रशासन सरसावले आहे. मात्र बुधवारपासून (ता. १५) नव्या नियमानुसार बारकोड, टॅगिंग, मोबाईल स्कॅनिंगला छावणीचालकांनी विरोध केला आहे.

 जिल्हाभरातील बऱ्याच राजकीय नेत्यांनीही छावणीचालकांची बाजू घेत प्रशासनाला निवेदने देणे सुरू केले आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये छावणीचालक व प्रशासनात संबंध ताणण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

गेल्या दहा वर्षांत सुरू केलेल्या छावण्यांचा विचार करता त्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. नगर जिल्ह्यामध्ये साडेचारशे संस्थांवर त्यामुळे कारवाई झाली. छावण्यांत दाखल असलेल्या मोठ्या जनावरांना ९० रुपये तर लहान जनावरांला ४५ रुपये प्रती दिवस याप्रमाणे अनुदान दिले जाते.

मात्र छावणीत कमी जनावरे असताना जास्त संख्या दाखवून अनुदान लाटण्यात येत असल्याचे प्रकार घडतात. त्यामुळे याआधीचा अनुभव पाहता यंदा असे काही होऊ नये यासाठी शासनाने अनेक नियम घातले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून १५ मे पासून प्रत्येक जनावरांची संगणकीय नोंद करण्यात येणार असून त्यासाठी बारकोड टॅगिंग, मोबाईल स्कॅनिंग जोडण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय छावण्यांना मंजुरीकरिता ४८ अटी-शर्ती आहेत. मात्र अनेक छावणीचालकांनी बारकोड टॅगिंग, मोबाईल स्कॅनिंगला विरोध केला असून शुक्रवारी नगर व पाथर्डी तालुक्यातील छावणीचालकांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. 

प्रत्येक छावणीमध्ये पशुधनाची कमाल मर्यादा ५०० आहे. ही अट शिथिल करावी. प्रत्येक जनावर मालकास पाच जनावरे छावणीत दाखल करता येतील, ही अट ताबडतोब रद्द करण्यात यावी. छावणीचालकांना प्रति जनावर ९० रुपये अनुदान देण्यात येते; परंतु शेडउभारणी, प्रकाशयोजना, पाणीपुरवठा, चारा, मूरघास या सर्व बाबींवर मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे अनुदानात वाढ करावी अशी छावणीचालकांची प्रमुख मागणी आहे.

काही चालकांनी बारकोड टॅगिंग, मोबाईल स्कॅनिंगवर बहिष्कार घालण्याचाही इशारा दिला आहे. प्रशासन मात्र शासनाने घालून दिलेल्या नियमानुसारच छावण्या चालवाव्या लागतील असे ठासून सांगत आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये छावणीचालक व प्रशासनात संबंध ताणण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आता छावणीचालकांच्या भूमिकेवर प्रशासन काय भूमिका घेतेय याकडे लक्ष लागले आहे. 

शेतकरी-चालकांतही संघर्ष सुरू
जनावरांच्या छावण्यांत १५ मेपासून १८ किलो चारा द्यावा लागणार आहे. मात्र सध्या चाऱ्याचे दर वाढलेले असल्याने आम्ही १८ किलो चारा देणार नाही, असे चालक आताच सांगत आहेत. शिवाय नियमानुसार खुराक देण्याबाबतही अनेक ठिकाणी उदासीनता आहेत. विचारणा करणाऱ्यांना अरेरावी केली जाते. त्याबाबत प्रशासनाकडे तक्रारीही दाखल आहेत. ‘‘आमची बिले नाहीत, आम्ही पदरमोड करतोय’’असे सांगून नियमाने चारा व खुराक देण्याला टाळाटाळ होत असल्याने चालक व शेतकरी यांच्यातही अनेक ठिकाणी बोलाचाली सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

इतर अॅग्रो विशेष
पूरक धोरणानेच वाढेल निर्यातकें द्रातील मोदी सरकारच्या सुरवातीच्या काळात...
निवडणूक आयोगाला घरचा आहेर! सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदान प्रक्रिया कालच...
विरोधी पक्षनेता आज ठरणार; पृथ्वीराज...नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...
कृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशीपुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या...
विषबाधा नियंत्रणाची जबाबदारी आता...यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधा...
उन्हाचा चटका अन् उकाड्यातही वाढपुणे : विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह मध्य...
SakalSaamExitPolls : महाराष्ट्रात...- सकाळ आणि सामच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात...
रानडुकरांचे पर्यावरणस्नेही व्यवस्थापनवनविभाग किंवा जंगलाच्या आसपास असलेल्या...
मराठवाड्यात भीषण जलसंकटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८२४ लघू मध्यम...
पशुपालन, प्रक्रिया उद्योगात नेदरलॅंडची...शास्त्रीय पद्धतीने पशुपालन, दुग्धोत्पादन आणि...
आदिवासी पाड्यावर रुजली कृषी उद्योजकताकोणे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथील आदिवासी...
मंडळ स्तरावरील अचूक हवामान अंदाजासाठी...परभणी ः महावेध प्रकल्पांतर्गत मंडळ स्तरावरील...
विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. यातच दोन...
राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प...नाशिक: कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, या...
मॉन्सून मंगळवारपर्यंत उत्तर...पुणे: नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. १८...
राज्याचे स्वतंत्र निर्यात धोरण ठरणारनागपूर ः शेतीमालाची निर्यात दुपटीने वाढविण्याचे...
राज्यात कापूस बियाणे विक्री २५ मेपासूनजळगाव ः राज्यातील पूर्वहंगामी कापूस लागवड...
दुष्काळात परवडीने ओलांडली सीमा (video...औरंगाबाद : वीस वर्षांचा होतो तवापासून शेतीत राबतो...
Breaking : मॉन्सून अंदमानात दाखलपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (ता. १८)...
बिगर नोंदणीकृत जैविक उत्पादनात खत...पुणे : शेतकऱ्यांना पुरविल्या जाणाऱ्या बिगर...