agriculture news in marathi, fodder crop plantation status in pune region, maharashtra | Agrowon

पुणे विभागात २१७० हेक्‍टरवर चारा पिकांची पेरणी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 मार्च 2018
पुणे ः उन्हाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई भासू नये, म्हणून शेतकरी चारा पीक लागवडीची तयारी करू लागले आहेत. सध्या पाणी उपलब्ध असलेल्या भागात शेतकरी मका, कडवळ, नेपिअर ग्रास आदी पिकांची पेरणी करत आहे. पुणे विभागात आतापर्यंत २१७० हेक्‍टरवर चारा पिकांची लागवड झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात चाऱ्याची टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. 
 
पुणे ः उन्हाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई भासू नये, म्हणून शेतकरी चारा पीक लागवडीची तयारी करू लागले आहेत. सध्या पाणी उपलब्ध असलेल्या भागात शेतकरी मका, कडवळ, नेपिअर ग्रास आदी पिकांची पेरणी करत आहे. पुणे विभागात आतापर्यंत २१७० हेक्‍टरवर चारा पिकांची लागवड झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात चाऱ्याची टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. 
 
गेल्या चार ते पाच वर्षांत पुणे विभागात मोठ्या प्रमाणात चाराटंचाई भासली होती. त्याची दखल घेऊन शासनाला चारा छावण्या सुरू कराव्या लागल्या होत्या. त्यातच पशुपालकांना चाऱ्यासाठी भटकंती करावी लागली होती. अशी परिस्थिती यंदा उद्‌भवू नये म्हणून शेतकरी काळजी घेऊ लागले आहे. वाळलेल्या चारा पिकांबरोबर हिरवा चाराही उपलब्ध व्हावा म्हणून शेतकरी मका, कडवळ, नेपिअरग्रास यासारख्या पिकांची पेरणी करत आहे.
 
ग्रामीण भागात अनेक सहकारी साखर कारखाने सुरू आहेत. त्यामुळे चाऱ्यासाठी शेतकरी उसाच्या वाड्याची खरेदी करून तो वाळविण्याचे नियोजन करीत आहे. मात्र उसाच्या वाड्याचा दर अधिक असल्याने काही शेतकरी मका, कडवळ पेरणीवर भर देत आहेत.
  
सध्या पुणे विभागात मका पिकाची ८२० हेक्‍टरवर तर कडवळाची ११६० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. लसूण घासाची अवघ्या दहा हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. इतर चारा पिकांची १७० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. 
 
विभागातील नगर जिल्ह्यात दहा तर सोलापूर जिल्ह्यात २१६० हेक्‍टरवर चारा पिकांची पेरणी झाली असल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्यात अजूनही चारा पिकांची पेरणी झालेली नसल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
द्राक्षावरील उडद्या भुंगेऱ्यांच्या...द्राक्ष विभागामध्ये ऑक्टोबर छाटणी व त्यानंतरचा...
कळमणा बाजारात सोयाबीन प्रतिक्‍विंटल...नागपूर ः कळमणा बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढती...
जनावरांच्या अाहारात बुरशीजन्य घटकांचा...अाहाराद्वारे जनावरांच्या शरीरात बरेच हानिकारक घटक...
मोहरी, जवस लागवड व्यवस्थापनरब्बी हंगामात तेलबिया पिके अत्यंत महत्त्वाची असून...
मुरघासाचे फायदे, जनावरांसाठी वापरचाऱ्याच्या कमतरतेमुळे दूध उत्पादनामध्ये सातत्य...
जळगाव जिल्ह्यात खरेदी केंद्रांतील...जळगाव : कडधान्य खरेदीसंबंधी शासकीय खरेदी...
टंचाईत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा ः...नांदेड ः टंचाईच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे...
वऱ्हाडात सहा तालुक्‍यांत गंभीर दुष्काळअकोला : अनियमित आणि सरासरीपेक्षा कमी झालेल्या...
अमरावती जिल्ह्यातील ‘रब्बी`...अमरावती : कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी १ लाख ६८...
संकरित कपाशीचे ‘नांदेड ४४’ वाण...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने...
सांगली जिल्ह्यातील सर्वच तलाव आटलेसांगली ः ताकारी, टेंभू, आरफळ योजनेच्या पाण्यामुळे...
पुणे विभागात अवघ्या सहा टक्के पेरण्यापुणे ः पावसाळ्यात पडलेल्या पावसाच्या खंडाचा...
राज्यात दुष्काळसदृश नाही, तर दुष्काळ...मुंबई : यंदा झालेल्या कमी पावसामुळे राज्याच्या...
अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...