agriculture news in marathi, fodder crop plantation status,maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात उन्हाळ्यात चाराटंचाई भासण्याची शक्‍यता
टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 जानेवारी 2018
मी दुग्ध व्यवसाय करीत असल्यामुळे माझ्याकडे एकूण पंधरा जनावरे आहेत. सध्या एक एकरावर मका, लसूणघास एक एकरावर आहे. तसेच वाळलेला चारा उपलब्ध आहे. उन्हाळ्यात चारा कमी पडत असला तरी पाणी असल्यामुळे अजून हिरव्या चारापिकांची पेरणी करणार आहे.  
- बजाबा मालपोटे, फळणे, ता. मावळ, जि. पुणे.
पुणे  ः मोठ्या प्रमाणात असलेल्या जनावरांच्या संख्येमुळे पुरेसा चारा उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामातील चारा लागवडीची स्थिती पाहता यंदा उन्हाळ्यात चाराटंचाई भासण्याची शक्‍यता आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत २८,०९० हेक्‍टरवर चारापिकांची लागवड झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आतापासून चारा व्यवस्थापन करावे लागणार आहे. 
 
पूर्वेकडील शिरूर, दौड, इंदापूर, बारामती, इंदापूर, आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्‍यांतील अनेक शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. त्यामुळे या भागात पशुधनाची संख्या अधिक आहे. उन्हाळ्यात जनावरांसाठी लागणारा चाऱ्याची सोय म्हणून बहुतांशी शेतकरी रब्बी हंगामात मका, ज्वारी, कडवळ, बाजरी, लुसर्न घास, नेपिअर ग्रास अशी चारापिके घेतात. काही शेतकरी मका, कडवळ, बाजरी ही पिके दोन ते तीन महिन्यांनी काढून तो वाळवून साठवणूक करतात. काही शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध असल्याने उन्हाळ्यातही हिरव्या चाऱ्याचे नियोजन ते करतात. त्यामुळे उन्हाळ्यात भासणारी चाराटंचाई कमी होण्यास मदत होते.
 
यंदा पुणे जिल्ह्यात चारापीक लागवडीचा आढावा घेतल्यास बहुतांशी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी चारापिकांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. यंदाच्या रब्बी हंगामात पुरंदर, मुळशी तालुक्‍यात नव्याने चारापिकांची लागवड झाली नसल्याचे चित्र आहे. भोर, मावळ, वेल्हे तालुक्‍यांत अगदी अल्प प्रमाणात चारापिकांची लागवड झाली आहे. 
 
दरवर्षी पूर्वेकडील तालुक्‍यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात चारापिकांची लागवड करत असतात. परंतु यंदा हे तालुकेदेखील चारापिकांपासून दूर असल्याचे चित्र आहे. यंदा शिरूर तालुक्‍यात ७४३० हेक्‍टरवर चारापिकांची लागवड झाली आहे. इंदापूर तालुक्‍यात ५४८०, बारामती तालुक्‍यात ५१५०, जुन्नर तालुक्‍यात २४३०, खेड तालुक्‍यात ११४०, आंबेगाव तालुक्‍यात १६८०, दौंड तालुक्‍यात ३२५० हेक्‍टरवर चारापिकांची लागवड झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
 
सध्या जिल्ह्यातील शिरूर, बारामती, इंदापूर, दौड, आंबेगाव, जुन्नर, मावळ या भागांत साखर कारखाने सुरू आहेत.  शेतकऱ्यांना ऊस वाडे उपलब्ध असले तरी त्यास शेकडा ४०० ते ५०० रुपये एवढा दर आहे. पुढील एक ते दोन महिन्यांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.  पीकनिहाय झालेली चारापिकांची लागवड ः (हेक्‍टरमध्ये) : मका ७७६०, ज्वारी कडवळ  ५०००, बाजरी ८००, लुसर्न ग्रास ९३०, नेपिअर ग्रास ३४०, इतर चारापिके  १३,२६०, एकूण २८,०९०.

 

 

 

इतर ताज्या घडामोडी
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुणे जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या...पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान...
हिंगोलीतील २७ हजार लोकसंख्या पाण्यासाठी...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
खानदेशात चारा प्रश्‍न गंभीरजळगाव ः खानदेशात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या...
दुष्काळमुक्त मराठवाड्याचा संकल्प ः...औरंगाबाद: पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात...
छपन्न इंचीच्या छातीच्या गप्पा कशाला?ः...चाकण, जि. पुणे: देशाचे पंतप्रधान देश माझ्या मुठीत...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कृषी क्षेत्रात निर्मिती उद्योगाच्या...अकोला : कृषी क्षेत्रात बायोफर्टिलायजर,...
खानदेशात भुईमूग पीक जेमतेमजळगाव : भुईमुगाचे पीक खानदेशात जेमतेम आहे. त्याचे...
सोलापूर जिल्हा बॅंकेतही मिळणार ‘सन्मान...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
प्रस्तावित सुरत-हैदराबाद...नाशिक : केंद्राच्या भारतमाला योजनेंतर्गत...
शेवगाव, पाथर्डीत शेळ्या-मेंढ्यांच्या...शेवगाव, जि. नगर : दुष्काळी परिस्थितीत सरकारने...
सांगलीचा प्रश्‍न दिल्लीदरबारीसांगली ः सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीला...