agriculture news in marathi, fodder crops production status, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात यंदा मुबलक चारा 
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 एप्रिल 2018

नगर: जिल्ह्यात यंदा मुबलक चारा उपलब्ध आहे. त्यामुळे साधारण जूनपर्यंत तरी चाराटंचाई भासणार नाही असे कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या अहवालातून  स्पष्ट होत आहे. जिल्ह्यामध्ये १६ लाख ४८ हजार ५४८ जनावरे असून ६३ लाख ३३ हजार ५६७  मेट्रीक टन चारा उपलब्ध आहे. जून महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात  मात्र दोन लाख १९ हजार १३३ मेट्रिक टन चाऱ्याची तूट भासण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

नगर: जिल्ह्यात यंदा मुबलक चारा उपलब्ध आहे. त्यामुळे साधारण जूनपर्यंत तरी चाराटंचाई भासणार नाही असे कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या अहवालातून  स्पष्ट होत आहे. जिल्ह्यामध्ये १६ लाख ४८ हजार ५४८ जनावरे असून ६३ लाख ३३ हजार ५६७  मेट्रीक टन चारा उपलब्ध आहे. जून महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात  मात्र दोन लाख १९ हजार १३३ मेट्रिक टन चाऱ्याची तूट भासण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

ऊस पिकाचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नगरमध्ये आता दुग्ध व्यवसाय वाढीस लागत आहे. मात्र मागील पाच ते सहा वर्षांच्या कालावधीतील दुष्काळी स्थितीचा दुग्ध व्यवसायावर गंभीर परिणाम झाला. चाराटंचाईमुळे जनावरे विकावी लागली. गेल्या दोन वर्षांपासून मात्र स्थिती चांगली आहे. यंदा तर पशुसंवर्धन विभागाच्या अहवालानुसार मुबलक चारा असल्याने अगदी जून महिन्याच्या शेवटच्या सप्ताहापर्यंत चारा उपलब्ध असेल.

२०१२ मधील १९ व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यामध्ये मोठी १३ लाख ५९ हजार ०४८ तर लहान २ लाख ८९ हजार पाचशे अशी १६ लाख ४८ हजार ५४८ जनावरे आहे. मोठ्या जनावराला दर दिवसाला सहा किलो चाऱ्याप्रमाणे ८१५४ मेट्रीक टन तर लहान जनावरांना प्रतिदिन तीन किलो प्रती जनावराप्रमाणे ८६५.५ मेट्रीक टन चारा आवश्‍यक आहे. याशिवाय जिल्ह्यामध्ये असलेल्या शेळ्या-मेंढ्यासाठी दर दिवसाला सहा क्विंटल चाऱ्याची गरज आहे.

जून महिना अखेरचा विचार करता मोठ्या जनावरांना ५७ लाख २९ हजार ९४०६ तर लहान जनावरांना ५ लाख ७० हजार ६०४ टन, शेळ्या-मेढ्यासाठी २ लाख ५२ हजार ६९० टन चाऱ्याची गरज आहे. उपलब्ध असलेल्या ६३ लाख ३३ हजार ५६७  मेट्रीक टन चाऱ्यानुसार शेवटच्या टप्प्यात दोन लाख १९ हजार १३३ मेट्रीक टन चाऱ्याची तूट भासण्याचा अंदाज आहे. मात्र मागील काही वर्षांचा विचार करता यंदा मुबलक चारा उपलब्ध आहे, असे अहवालात नमूद केले आहे. 

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...