नगर जिल्ह्यात साठ हजार हेक्‍टरवर चारा पिके

नगर जिल्ह्यात साठ हजार हेक्‍टरवर चारा पिके
नगर जिल्ह्यात साठ हजार हेक्‍टरवर चारा पिके

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा चारा पिकांचे पेरणी क्षेत्र साधारण दहा हजार हेक्‍टर क्षेत्राने वाढले आहे. पावसाळ्याचे अडीच महिने उलटले तरी अजून पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे चाऱ्याची टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे यंदा पाणी उपलब्ध असलेल्या भागात चारा पिके घेण्याला प्राधान्य दिले असल्याचे सांगितले आहे. यंदा आत्तापर्यंत ५९ हजार ८७१ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.

नगर जिल्ह्यामध्ये दूध व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे चारा उत्पादनावर शेतकऱ्यांचा भर असतो. दरवर्षी साधारण ४५ ते ५५ हजार हेक्‍टर क्षेत्रावर चारा पिके घेतली जातात. यंदा मात्र चाऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. यंदाचा पावसाळा होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, तरीही अजून पुरेसा पाऊस नाही. मध्यंतरी दीड महिना तर पूर्णतः पाऊस गायब होता.

शेतात चारा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्‍न भेडसावण्याचा अंदाज बांधून पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी चारा पेरणीला प्राधान्य दिले असल्याने चारा क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यामध्ये खरीप मकाची २२८१५, कडवळाची १३२६९, खरीप बाजरीची १८४, लुसर्न घासाची ११११३, नेपीयर ग्रासाची ३३५२, व इतर चारा पिकांची ९१३८ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे.

उसाची आवक वाढली चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला की उसाचा चाऱ्यासाठी वापर केला जातो. सध्या चाऱ्यासाठी उसाला मागणी वाढल्याने नगरसह जिल्हाभरातील बाजार समितीत सध्या उसाची आवक वाढली आहे.

तालुकानिहाय चारापिकाचे क्षेत्र (हेक्‍टर) नगर ः ४,८०८, पारनरे ः ४,२८८, पारनरे ः ३,९४२, कर्जत ः३३, जामखेड १,४१०, शेवगाव ः २,५३२, पाथर्डी ः ३,६९२, नेवासा ः ९,९३०, राहुरी ः ३,३३८, संगमनेर ः ८,९६९, अकोले ः ३,०३४, कोपरगाव ः २,४८०, श्रीरामपूर ः ४,३२८, राहाता ः ७,०८७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com