agriculture news in marathi, fodder crops sowing status, pune, maharashtra | Agrowon

पुणे विभागात चारापिकांची एक लाख हेक्टरवर लागवड
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये म्हणून खरीप हंगामात चारापिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. चारापिकांच्या क्षेत्रात चांगलीच वाढ होत आहे. पुणे विभागातील पुणे, सोलापूर, नगर या तीन जिल्ह्यांत आॅक्टोबरअखेरपर्यंत एक लाख १३ हजार ५०० हेक्टरवर चारापिकांची लागवड झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. रब्बी हंगामात पाणीटंचाई भासण्याची शक्यता असल्याने चारापिकांची पेरणी कमी प्रमाणात होणार असून, यंदा पाणीटंचाईबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे.

पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये म्हणून खरीप हंगामात चारापिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. चारापिकांच्या क्षेत्रात चांगलीच वाढ होत आहे. पुणे विभागातील पुणे, सोलापूर, नगर या तीन जिल्ह्यांत आॅक्टोबरअखेरपर्यंत एक लाख १३ हजार ५०० हेक्टरवर चारापिकांची लागवड झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. रब्बी हंगामात पाणीटंचाई भासण्याची शक्यता असल्याने चारापिकांची पेरणी कमी प्रमाणात होणार असून, यंदा पाणीटंचाईबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे.

यंदा चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. परंतु प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडल्याने खरीप पिके वाया गेली. पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात झालेल्या पावसामुळे धरणे भरली असली तरी, त्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी अधिक होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतीसाठी धरणातून पाणी उपलब्धता कमी होणार आहे. पावसाळ्यात शेवटच्या टप्प्यात पाऊस झाल्यास जानेवारीपर्यंत हिरवा चारा उपलब्ध असतो. मात्र, यंदा पावसाळ्यात पडलेल्या खंडामुळे सुरवातीपासून चारापिकांचे प्रमाण अत्यंत कमी राहिले आहे. पावसावर उगवलेला चाराही आता वाळू लागला आहे. येत्या काळात जनावरांच्या चारा, पाण्याची सोय कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

शेतीला पूरक उद्योग म्हणून बहुतांशी शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. जनावरांसाठी चारा वेळेत उपलब्ध व्हावा, म्हणून अनेक शेतकरी हिरवा चाऱ्यासाठी मका, कडवळ, बाजरीची पेरणी तर नेपिअर ग्रास, लुसर्नग्रास अशा विविध चारापिकांची लागवड करतात. त्यामुळे जनावरांना वर्षभर पुरेल एवढा चारा टप्प्याटप्प्याने उपलब्ध होतो. याशिवाय साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्यानंतर अनेक शेतकरी उसाच्या वाड्याचा वापर चारा म्हणून करतात. याशिवाय सुका चारा म्हणून वाळलेले वाडे, मका, कडवळ याचे नियोजन करून तो जनावंरासाठी वापर करतात. त्यामुळे बऱ्यापैकी चाऱ्याची समस्या कमी होण्यास मदत होते.

मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी चारा टंचाईमुळे जनावरासाठी चारा छावण्या सुरू करण्याची वेळ शासनावर आली होती. पुन्हा तशीच स्थिती उद्भवू नये, म्हणून शेतकरी पुढाकार घेऊन चारापिकांचे नियोजन करत आहे. त्यासाठी कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांना मका पिकासारख्या चारापिकांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येते. त्याचा फायदा बहुतांशी शेतकरी घेत चारापिकांची सुमारे दीड लाखाहून अधिक हेक्टरवर पेरणी करतात. त्यामुळे बऱ्यापैकी चारापिकांचे उत्पादन मिळते.
 

पुणे विभागात पीकनिहाय झालेली पेरणी (हेक्टर)
पीक झालेली पेरणी
मका ४६,५५०
कडवळ २६,५२०
बाजरी १,०८०
लुसर्नग्रास १५,४९०
नेपिअरग्रास ५१९०
इतर चारापिके १८,७४०

 

इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...