agriculture news in marathi, Fodder from other districts to save livestock | Agrowon

नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर जिल्ह्यांतून चारा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत. सध्या जिल्ह्यातील चारा संपल्याने दावणी आणि छावणीतील जनावरे कशी जगवायची, हा प्रश्‍न आहे. उजनी, मुळा, भंडारदरा आदी धरणांच्या लाभक्षेत्रातील आडसाली ऊस तीन महिने पुरेल, असे प्रशासन सांगते. दुसरीकडे छावण्यांबाबत शासनाने कडक नियमावली राबविल्याने कटकट नको, म्हणून अनेक छावणीचालकांनी बाहेरच्या जिल्ह्यातून ऊस आणण्यास सुरवात केली आहे. सध्या पुणे, सोलापूर आणि उस्मानाबाद या शेजारच्या जिल्ह्यांतून चाऱ्याची वाहतूक सुरू आहे.

नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत. सध्या जिल्ह्यातील चारा संपल्याने दावणी आणि छावणीतील जनावरे कशी जगवायची, हा प्रश्‍न आहे. उजनी, मुळा, भंडारदरा आदी धरणांच्या लाभक्षेत्रातील आडसाली ऊस तीन महिने पुरेल, असे प्रशासन सांगते. दुसरीकडे छावण्यांबाबत शासनाने कडक नियमावली राबविल्याने कटकट नको, म्हणून अनेक छावणीचालकांनी बाहेरच्या जिल्ह्यातून ऊस आणण्यास सुरवात केली आहे. सध्या पुणे, सोलापूर आणि उस्मानाबाद या शेजारच्या जिल्ह्यांतून चाऱ्याची वाहतूक सुरू आहे.

जिल्ह्यात यंदा दुष्काळामुळे नागरिक, शेतकरी त्रस्त आहेत. चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई आहे. त्यामुळे पशुधन जगवणे एवढेच काम सध्या लोकांना आहे. जनावरे जगविण्यासाठी शासनाने छावण्या सुरू केल्या. पण, छावणी चालकांनाही चाऱ्याची चिंता आहेच. 

जिल्ह्यात १६ लाख ४१ हजार मोठी व ११ लाख ५० हजार लहान जनावरे आहेत. त्यांना दरमहा दोन लाख ३५ हजार मेट्रिक टन चारा लागतो. 

पशुधन वाचविण्यासाठी शासनाने दुष्काळात चारा छावण्या सुरू केल्या. सध्या ४०० छावण्यांमध्ये लहान-मोठी पावणेदोन लाख जनावरे आहेत. संबंधित चालकांकडून सरकारने ४० प्रकारच्या अटी व शर्ती घालून दिल्या. त्यात मोठ्या जनावरांना प्रतिदिन १५ व लहान जनावरांना प्रतिदिन ७.५ किलो हिरवा चारा आणि आठवड्यातून तीन दिवस एक व अर्धा किलोप्रमाणे पशुखाद्य देण्याची प्रमुख अट ठेवण्यात आली. शिवाय मोठ्या जनावरांना सहा किलो व लहान जनावरांना तीन किलो वाळलेला, प्रक्रिया केलेला चारा देण्याचेही सांगण्यात आले.

मार्चअखेर जिल्ह्यातील चारा वापरण्यात आला. मात्र, ३० जूनपर्यंत छावण्या सुरू ठेवण्यात येणार असल्याने पुढचे तीन महिने कसे काढायचे, हा महत्त्वाचा प्रश्‍न होता. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय छावणी बंद केल्यास मागील १५ दिवसांचे अनुदान दंड म्हणून वसूल करण्याच्या नियमामुळे, छावण्या सुरू ठेवण्यासाठी चालकांना आता कसरत करावी लागत आहे. सध्या शेजारच्या जिल्ह्यातून ऊस व उपलब्ध असेल. त्या हिरव्या चाऱ्याची वाहतूक सुरू झाली आहे. चाऱ्याचे वाढलेले भाव व वाहतूक या खर्चाचा ताळमेळ चालकांना बसविता येणार का, हा प्रश्‍न आहे.

गाळपेराची मका उपयोगी
जिल्हा परिषदेने डिसेंबर महिन्यात गाळपेर क्षेत्रातील शेतकऱ्यांना प्रत्येकी एक हेक्‍टरपर्यंतचे बियाणे वाटले होते. त्यातून अंदाजे एक लाख ३५ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. जिल्ह्यातील आडसाली उसाचाही चारा म्हणून उपयोग करणे सुरू आहे. राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत पाच हजार ८१७ हेक्‍टर व गाळपेर क्षेत्रावर ४५१ हेक्‍टर मका घेण्यात आली. तीही चारा म्हणून दिली जाऊ शकते. आडसाली ऊस सध्या चार ते आठ महिन्यांचा आहे.

इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...
सातारा जिल्ह्यात २५४ टँकरद्वारे...सातारा  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची...
नगरमधील शेतकऱ्यांना साडेचाळीस कोटींचे...नगर  ः सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २००...
सांगलीत शेतकऱ्यांचा जनावरांसह मोर्चासांगली  : जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता...
वऱ्हाडात बाजी कुणाची?अकोला ः  लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही...
पुणे विभागात ‘जलयुक्त’ची आठ हजारांवर...पुणे : भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने...
नेता निवडीचा अधिकार राहुल गांधींनामुंबई  ः काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेता...
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...