agriculture news in marathi, Fodder prices high | Agrowon

चारा दरात तेजी, कडबा दुरापास्त
टीम अॅग्रोवन
रविवार, 28 जानेवारी 2018

जळगाव (प्रतिनिधी) ः जिल्ह्यात ज्वारीचा कडबा मिळणे दुरापास्त झाले आहे. दादरची कुट्टीही मिळत नसून, कुट्टी व कडब्याचे दरही वाढले आहेत. ज्वारीचा कडबा अडीच हजार रुपये शेकडा, तर दादरचा कडबा किमान साडेतीन हजार रुपये शेकडा आहे. चढ्या दरांचा फटका पशुधनपालकांना बसत असून, दुग्ध उत्पादकांना महागडा कोरडा चारा आणावा लागत आहे.

जळगाव (प्रतिनिधी) ः जिल्ह्यात ज्वारीचा कडबा मिळणे दुरापास्त झाले आहे. दादरची कुट्टीही मिळत नसून, कुट्टी व कडब्याचे दरही वाढले आहेत. ज्वारीचा कडबा अडीच हजार रुपये शेकडा, तर दादरचा कडबा किमान साडेतीन हजार रुपये शेकडा आहे. चढ्या दरांचा फटका पशुधनपालकांना बसत असून, दुग्ध उत्पादकांना महागडा कोरडा चारा आणावा लागत आहे.
थंडीच्या दिवसात किमान एक वेळ तरी कोरडा चारा पशुधनाला मिळायला हवा, असे शेतकरी मानतात. त्यातल्या त्यात ज्वारीचा चारा पोषक असतो. हा चारा आपल्याकडे असावा म्हणून दुग्ध उत्पादक ज्वारीचा कडबा खरेदी करीत असून, पुरेसा पाऊस झालेल्या सातपुडा पर्वतालगतच्या भागातून हा चारा मागवून घेतला जात आहे.
जिल्ह्यात भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, भडगाव, जामनेर, पाचोरा, जळगाव या भागांत ज्वारीचे पीक कमी पावसाने हातचे गेले होते. त्यामुळे कडबाही हवा तसा हाती आलेला नाही. दीड एकरात फक्त १०० ते १२५ पेंढ्या कडबा मिळाला. कारण ज्वारीच्या पिकात पावसाच्या लहरीपणामुळे तूट होती. अनेकांनी पीक मोडले होते. रावेर, यावल, चोपडा व अमळनेरच्या तापीकाठालगतच्या भागात काही शेतकरी ज्वारी पेरतात. याच शेतकऱ्यांचे उत्पादन तेवढे आले आहे. ज्वारीचे क्षेत्र ४० ते ४५ हजार हेक्‍टर असते, परंतु यंदा जेवढे क्षेत्र होते, त्यातून २० टक्केही चारा मिळाला नाही.
ज्वारीचा कोरडा चारा संपत आला आहे. तर दादर (ज्वारी) रब्बी हंगामात असते. तिची कापणी व मळणी अजून सुरू व्हायची आहे. दादरचा कडबा फेब्रुवारीच्या मध्यात मिळू शकेल. अर्थातच सद्यःस्थितीत फक्त तुरीचा पाला, भुसा पशुधनासाठी मिळत आहे. तोदेखील हवा तेवढा नाही. दुग्ध उत्पादकांना हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करून ठेवावी लागली आहे.

सध्या ज्वारीचा चारा मिळतच नाही. दादरची कुट्टी बाजार समितीनजीक विक्रेत्यांकडे मिळते. ट्रॉलीभर दादरची कुट्टी साडेसात हजार रुपयांपेक्षा अधिक दरात पडते. वाहतूक खर्च व कडबा कटर करायचा खर्च वेगळा लागतो. यंदा दुधाचे दरही संघांनी कमी केल्याने दुहेरी फटका बसू लागला आहे.
- काशिनाथ चिंधू पाटील, दूध उत्पादक, कंडारी, जि. जळगाव

इतर ताज्या घडामोडी
मत्स्यपालनामध्ये योग्य तांत्रिक बदलांची...सध्याच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कोणतेही बदल न...
जळगाव बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणात...जळगाव ः शालेय पोषण आहार वाटपानंतर अंगणवाडीमधील...
सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीस सुरवातसातगाव पठार, जि. पुणे : काही गावांमध्ये पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह...सांगोला/करमाळा : जिल्ह्याच्या काही भागांत...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात...पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी...
मातीचा प्रत्येक कण सोन्यासारखा; तो वाया...नाशिक : शेतातील माती म्हणजे कोट्यवधी सूक्ष्म...
नांदेड जिल्ह्यात १ लाख ६५ हेक्टरवर पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप...
शेतकऱ्यांना पीककर्ज देणे टाळले तर ठेवी...नगर  ः शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामासाठी...
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायमसातारा  ः जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण,...
नांदेड जिल्ह्यात फक्त ८.२९ टक्के...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील यंदा खरीप पीककर्ज...
तापीच्या पाण्यास गुजरातचा नकारमुंबई  ः पार-तापी नर्मदा नद्याजोड...
कापूस पीक नियोजनातून हमखास उत्पादन वाढसोनगीर, जि. धुळे ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी...
औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसलाऔरंगाबाद  : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या...
`दमणगंगा नदीजोड योजनेचे फेरसर्व्हेक्षण...नाशिक : दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे...
मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ३ लाख ६७...
पीककर्जासाठी बँक अधिकाऱ्याने केली...दाताळा, जि. बुलडाणा : पीककर्ज मंजूर करून...
माॅन्सून सक्रिय, सर्वत्र चांगल्या...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी झालेले असून १००४...
‘एसआरआय’पद्धतीने भात लागवडीचे तंत्रएसआरआय पद्धतीने भात लागवड केल्यामुळे रोपे, माती,...
भूमिगत निचरा प्रणालीद्वारे जमिनींची...पाणी व रासायनिक खते यांच्या अनियंत्रित वापरामुळे...
लागवड सावा पिकाची...जून महिन्यात सावा पिकाची पेरणी करावी. दोन ओळीतील...