agriculture news in marathi, Fodder scarcity on farmers | Agrowon

खानदेशात चाराटंचाईचे संकट
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 एप्रिल 2019

पशुधनाला कमी दरात चारापुरवठ्याची यंत्रणा उभारली पाहिजे. छावणीसाठी मंजुऱ्या का मिळाल्या नाहीत, हा प्रश्‍न आहे. कारण चारा पिकेही दुष्काळामुळे अपेक्षित प्रमाणात नाहीत. चारा महागला आहे. 
- आत्माराम पाटील, शेतकरी, कापडणे (जि. धुळे)

जळगाव : खानदेशातील पशुधनाच्या रोजच्या गरजेपेक्षा ३० ते ३५ टक्के चारा कमी उपलब्ध आहे. पुरेसा चारा पशुधनास उपलब्ध करताना शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. महाग चारा घेण्याची वेळ दूध उत्पादकांवर आली आहे. 

खानदेशातील धडगाव व अक्कलकुवा (जि. नंदुरबार) हे तालुके वगळता सर्वत्र दुष्काळी स्थिती आहे. प्रकल्पांमधील एकूण जलसाठा १२ टक्‍क्‍यांवर आहे. शिंदखेडा, अमळनेर, पारोळा, जामनेर, बोदवड, साक्री, धुळे, नंदुरबार या भागांत फेब्रुवारीपासून चाराटंचाई वाढली. शासनाने नंदुरबार, धुळे व जळगावात १० हजार हेक्‍टरवर चारा लागवडीसाठी हिवाळ्यात प्रयत्न सुरू केले.

पशुसंवर्धन विभागाने सुमारे २४ हजार शेतकऱ्यांना खानदेशात ५० हजार किलो, तर कृषी विभागाने सुमारे ४० हजार शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप केले. खानदेशात लहान, मोठे मिळून सुमारे १५ लाख पशुधन आहे. त्यात दुधाळ पशुधनाचाही समावेश आहे. सुमारे ३२ लाख मेट्रिक टन चारा वर्षाकाठी लागतो. सर्व पशुधनास रोज आठ हजार मेट्रिक टनांपेक्षा अधिक चारा लागतो. परंतु, एवढा चारा पशुधनास उपलब्ध करून देणे दुष्काळामुळे अशक्‍य झाले आहे. सर्वत्र चाराटंचाई आहे. 

दादर (ज्वारी) चा कडबा दुरापास्त झाला आहे. खानदेशात ऊस अत्यल्प क्षेत्रात होता. त्यापासून नगण्य चारा उपलब्ध झाला. रब्बी हंगाम जेमतेम राहिला. यामुळे ज्वारी, बाजरी व मक्‍याचा कडबा, गव्हाची काड, हरभऱ्याचा भुसाही अपेक्षित आला नाही. मक्‍याचा कडबा २५०० रुपये, दादरचा कडबा पाच हजार रुपये, तर बाजरीचा कडबा २५०० ते ३००० रुपये प्रतिशेकडा आहे. कडब्याचे दर २० ते २५ टक्‍क्‍यांनी वधारले आहेत. दुधाळ पशुधनाला पुरेसा चारा उपलब्ध करून देताना अधिकचा खर्च दूध उत्पादकांना करावा लागत आहे. चारा छावण्या व दावणीला चारा देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

इतर अॅग्रो विशेष
वर्धा : रोजगारासाठी स्थलांतरामुळे गावं...वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून...
गावाेगावी पाण्याच्या टॅंकरकडं नजरानगरः तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत,...
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची माहिती...मुंबई : दुष्काळासंदर्भात उत्तर देण्यासाठी...
सत्तर कारखान्यांना बजावली 'आरआरसी'पुणे : राज्यातील १९५ साखर कारखान्यांकडून...
सेवानिवृत्तीनंतर शिक्षकाची शेतीत सेवा...आयुष्यभर नोकरी करताना अनेक गोष्टींचा त्याग करावा...
पतआराखड्याची वाट न बघता खरिपासाठी कर्जपुणे : खरीप पीक कर्जवाटप नियोजनात मुख्य भूमिका...
गिलक्‍याने दिले अर्थकारणाला बळबाजारपेठेची गरज ओळखून कठोरा (ता. जि. जळगाव) येथील...
जरंडीत ‘एक गाव, एक वाण’ योजना फसलीनागपूर ः कापसाचे एक गाव एक वाण लावण्याचा आदर्श...
उन्हाचा चटका कायम राहणार पुणे : विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी...
आया मौसम बदली कामार्च ते मे हे तीन महिने शासकीय अधिकारी-...
आगीपासून वन वाचविण्याचा करूया निर्धारजंगलातील वाळलेला पालापाचोळा हा ज्वलनशील पदार्थ...
उद्योगाला साखर कडूचमहाराष्ट्रातील गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली...
‘एफआरपी'साठी शेतकरी संघटना पुन्हा...सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या...
विदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३...वर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त...
भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन...पुणे : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाची...
वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीरपाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे...
राज्यात आता पीकविमा शेतकरी सहभाग अभियानपुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा...
छावण्यातील जनावरांची आठवड्यातून एकदा...मुंबई ः दुष्काळी भागातील चारा छावण्यांमधील...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणीकोल्हापूर: निर्यातीच्या बाबतीत पिछाडलेल्या...
शुक्रवारपर्यंत उष्ण लाटेचा इशारापुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने चटका असह्य...