agriculture news in Marathi, fodder scarcity in January months in Sangali, Maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात जानेवारीतच चाराटंचाईचे सावट
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 जानेवारी 2018

सांगली ः  दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी व कवठेमहांकाळ तालुक्‍यातील निम्म्या भागात पंधरा दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध आहे. जानेवारीतच या भागात चाराटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्ण उन्हाळा कसा जाईल, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. सध्या पशुपालकांना चारा विकत घेण्यासाठी कऱ्हाड (जि. सांगली) येथे जावे लागत आहे. 

सांगली ः  दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी व कवठेमहांकाळ तालुक्‍यातील निम्म्या भागात पंधरा दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध आहे. जानेवारीतच या भागात चाराटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्ण उन्हाळा कसा जाईल, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. सध्या पशुपालकांना चारा विकत घेण्यासाठी कऱ्हाड (जि. सांगली) येथे जावे लागत आहे. 

दुष्काळी भागात बहुशांत शेतकरी चारापिकांची लागवड करतात. त्यामुळे जनावरांना चारा उपलब्ध होतो. मात्र, यंदा आटपाडी तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात परतीचा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेल्या चारापिकांची अपेक्षित वाढ झालीच नाही. पीकच आले नाही, त्यामुळे चारा कमी प्रमाणात उपलब्ध झाला. परिणामी जानेवारीतच चाराटंचाई भासू लागली आहे.

कवठेमहांकाळ तालुक्‍यात ज्या ठिकाणी पाणी आहे, त्या ठिकाणी चारा आहे. परंतु हा चारा कमी पडत असल्याने उसाचा चारा शोधण्यासाठी सांगली पशुपालक येऊ लागले आहेत. 

ऊस वाडे शेकड्यास ८०० ते ९०० रुपये
आटपाडी व कवठेमहांकाळ तालुक्‍यात चाराटंचाई निर्माण झाली आहे. सध्या साखर कारखाने सुरू आहेत. त्यामुळे उसाचे वाडे विक्रीसाठी दुष्काळी भागात ट्रक भरून दाखल होऊ लागले आहेत. आटपाडी तालुक्‍यात कऱ्हाड (जि. सातारा) या, तर सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा, पलूस, कडेगाव या भागांतून ओला चारा येऊ लागला आहे. उसाच्या वाड्यास प्रतिशेकड्यास ८०० ते ९०० रुपये असा सध्या दर आहे.

जत तालुक्‍यात मुबलक चारा
जत तालुक्‍यात परतीचा पाऊस झाल्याने तलावामध्ये पाणीसाठा आहे. शेतकऱ्यांनी चारापिकांची लागवड केली आहे. रब्बी हंगामातील पिकेही चांगली आहेत. त्यामुळे जत तालुक्‍यात चारा मुबकल असल्याने पशुपालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...