पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच तालुक्‍यांतील चारा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार डिसेंबर अखेरीसच तब्बल पाच तालुक्‍यांतील चारा संपलेला आहे. या महिन्यात (जानेवारी) अखेर तीन तालुक्‍यांतील, फेब्रुवारीअखेर दोन तालुक्‍यांत चारा संपणार आहे. मार्च पर्यंत दोन तालुक्‍यांत चारा पुरेल फक्त एका तालुक्‍यातच बऱ्यापैकी चारा उपलब्ध आहे. 

जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या अहवालातच ही बाब नमूद केलेली आहे. राज्यात सर्वाधिक सधन अशी ओळख असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये गंभीर चाराटंचाई निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, अजून कसल्याही उपाययोजना नाहीत. त्यामुळे आता चाऱ्यांची शोध घेण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. 

नगर जिल्ह्यामधील सर्वच भागात यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. खरीप वाया गेले, रब्बीत पेरणी नाही यामुळे सर्वाधिक गंभीर स्थिती चाऱ्याची झालेली आहे. पिण्याचे पाणीही मिळवणे अवघड झाले आहे. शासनाने जिल्ह्यामधील अकरा तालुक्‍यांत दुष्काळ जाहीर केला. त्याला आता अडीच महिने झाले, मात्र अजून कुठल्याही उपाययोजना झाल्या नाहीत. सध्या जिल्ह्याच्या बहुतांश भागात चाराटंचाई गंभीर आहे. जामखेड, कर्जत, नगर, पारनेर, पाथर्डी या पाच तालुक्‍यांतील चारा पंधरा दिवसांपूर्वीच संपलेला आहे.

या महिन्यात (जानेवारी) तीन तालुक्‍यांतील, पुढील महिन्यात (फेब्रुवारी) दोन तालुक्‍यांतील तर मार्चपर्यंत दोन तालुक्‍यांतील चारा संपणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या अहवालात ही माहिती नमूद केलेली आहे. विशेष म्हणजे गाय व म्हैस वर्गीय जनावरे वगळता शेळी, मेंढी अन्य मिळून सुमारे बारा लाख पशुधन आहे. त्यांच्या चाऱ्यांचाही गंभीर प्रश्‍न असून त्याबाबतही उपाययोजना करण्याबाबत काहीच हालचाली दिसत नाहीत. सरकारने दुष्काळ जाहीर केला; पण काही दिले जात नसल्याने शेतकऱ्यांची पशुधन जगण्यासाठी सुरू असलेली धडपड आणि चारा मिळण्यासाठी सुरू असलेली कसरत करताना दुष्काळी भागातील शेतकरी त्रस्त आहे.    आकडे बोलतात 

  •   मोठी जनावरे ः १३ लाख ६६ हजार ७०३ 
  •   लहान जनावरे ः २ लाख ७४ हजार २१५ 
  •   दर दिवसाला लागणारा चारा ः ७,८४६.४५ टन 
  •   महिन्याला लागणारा चारा ः २,३५,३९३.१७ टन 
  •   वर्षभरासाठी गरज ः २८ लाख ६३ हजार ९५७ टन 
  •   यंदाची उपलब्धता ः १५ लाख ६४ हजार ४१० टन
  • असा पुरेल चारा
    संगमनेर फेब्रुवारी २०१९ 
    कोपरगाव जानेवारी २०१९
    राहाता फेब्रुवारी २०१९ 
    नगर डिसेंबर २०१८
    पारनेर डिसेंबर २०१८
    कर्जत   डिसेंबर २०१८ 
    जामखेड डिसेंबर २०१८
    श्रीगोंदा  जानेवारी २०१९ 
    राहुरी  एप्रिल २०१९
    पाथर्डी डिसेंबर २०१८
    श्रीरामपूर जानेवारी २०१९
    नेवासा मार्च २०१९
    शेवगाव मार्च २०१९
    अकोले  (माहिती उपलब्ध नाही)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com