agriculture news in marathi, fodder shortage in district, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात चाराटंचाईचा प्रश्‍न गंभीर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 एप्रिल 2019

सासवडजवळील नावळी (ता. पुरंदर) येथील बलराम चारा छावणीत सध्या १०० हून अधिक जनावरे आहेत, तर सुमारे ३५० जनावरांची नोंदणी झाली आहे. छावणीत पुढील तीन ते चार दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे. पुढील चाऱ्याचे नियोजन तातडीने करावे लागणार आहे, अन्यथा छावणी बंद करण्याशिवाय पर्याय नाही. 
- सागर जगताप, बलराम चारा छावणी, नावळी, ता. पुरंदर.

पुणे  : जिल्ह्यात पाणीटंचाईबरोबरच चाराटंचाईचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. यामुळे जनावरांसाठी चारा कोठून आणायचा असा प्रश्‍न पशुपालकांसमोर उभा राहिला आहे. जिल्ह्यात सासवड, सुपा आणि शिरूर येथे तीन खासगी चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. मात्र त्यांच्याकडेही चाऱ्याची कमतरता असल्याने या छावण्याही बंद पडण्याची भीती आहे. दुसरीकडे राज्य सरकार, प्रशासन निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त असून, दुष्काळाची झळ त्यांच्यापर्यंत पोचूनही त्यांना गांभीर्य नसल्याने त्याचाही फटका पशुपालकांना बसत आहे.

जिल्ह्यात मार्च अखेरपर्यंत पुरेल एवढाच चारा उपलब्ध असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून दोन महिन्यांपूर्वी सांगण्यात आले. आता एप्रिल महिनाही संपत आला असताना प्रशासन आणि राज्य सरकार निवडणुकीमध्ये व्यस्त असल्यामुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष होत आहे. २०१२ च्या पशुगणेनुसार जिल्ह्यात साडेदहा लाख दुभत्या जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये संकरीत जनावरे ४ लाख ५६ हजार, देशी जनावरे ३ लाख ७ हजार आणि म्हैस २ लाख ९७ हजार असे एकूण साडेदहा, तर मेंढी, शेळी यांची संख्या जवळपास सहा लाख इतकी आहे.

सध्या पाणीटंचाई भीषण बनली असून, तब्बल १२० टॅंकरने जिल्ह्यातील पावणेतीन लाख नागरिकांची तहान भागवली जात आहे. पावसाअभावी शेतीतून उत्पन्न मिळाले नाही, हाताला काम नाही, अशा परिस्थितीत जनावरांना पाणी आणि चारा द्यायचा कोठून, त्यांना जगावयचे कसे असा मोठा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. चारा छावण्या सुरू करण्याबाबत जिल्ह्यातून अनेक प्रस्ताव प्रशासनाकडे आले आहेत. सद्यःस्थिती पाहता चारा छावण्या सुरू होणे अपेक्षित होते. जिल्ह्यातून आलेल्या प्रस्तावांना तात्काळ मंजुरी देऊन चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे. 
 

इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...
सातारा जिल्ह्यात २५४ टँकरद्वारे...सातारा  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची...
नगरमधील शेतकऱ्यांना साडेचाळीस कोटींचे...नगर  ः सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २००...
सांगलीत शेतकऱ्यांचा जनावरांसह मोर्चासांगली  : जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता...
वऱ्हाडात बाजी कुणाची?अकोला ः  लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही...
पुणे विभागात ‘जलयुक्त’ची आठ हजारांवर...पुणे : भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने...
नेता निवडीचा अधिकार राहुल गांधींनामुंबई  ः काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेता...
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...